लोणावळ्याच्या भूशी डॅमजवळील धबधब्यात पाच जण वाहून गेले: महिला आणि दोन मुलींचे मृतदेह सापडले
Lonavala Shocking Video: मान्सूनच्या आगमनानंतर पर्यटक पावसाचा आनंद घेण्यासाठी विविध ठिकाणी गर्दी करत आहेत. लोणावळ्यातील भूशी डॅम परिसरातील धबधब्यांचे सौंदर्य पाहण्यासाठी आलेल्या एका कुटुंबाला दुर्दैवाने मोठा फटका बसला आहे. रविवारी, पाण्यात उतरलेल्या पाच सदस्यांपैकी तिघांचे मृतदेह सापडले असून, उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे.
Lonavala Shocking Video
लोणावळ्याच्या भूशी डॅमच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्यात अन्सारी कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना घडली. पाण्याचा अंदाज न आल्याने हे कुटुंब पाण्यात बुडालं, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या कुटुंबातील साहिस्ता नियकत अन्सारी (वय 36), अमिमा आदिल अन्सारी (वय 13), आणि उमेश आदिल अन्सारी (वय 8) यांच्या मृतदेहांचा शोध बचाव पथकाने लावला आहे. अदनान संभाहर अन्सारी (वय 4) आणि मारिया अकील अन्सारी सय्यद (वय 9) हे दोन मुलं अद्याप बेपत्ता आहेत.
Video: मुलगा जमिनीवर पडला अन् डोक्यावरून नेली बाईक; थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
भूशी डॅम परिसरात यंदाच्या पावसाच्या मोसमात पहिल्यांदाच पाणी ओव्हरफ्लो झालं असून, यामुळे रविवारच्या सुट्टीच्या दिवशी येथे पर्यटकांची गर्दी झाली होती. या धबधब्यांच्या पाण्याचा आनंद घेत असताना पर्यटकांनी पायऱ्यांवर झोपून पाण्याचा आनंद घेतला. मात्र, अन्सारी कुटुंब डोंगरातील धबधब्याजवळ गेलं होतं, जिथे खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले.
Lonavala Shocking Video
पोलिस आणि बचाव पथकाच्या सततच्या प्रयत्नांनंतर अंधारामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं आहे. सोमवारी पुन्हा शोधकार्य सुरू होणार आहे. पोलिसांनी पर्यटकांना अनोळखी ठिकाणी जाण्याचे धाडस न करण्याचे आवाहन केलं आहे, कारण या प्रकारच्या अपघातांना बळी पडण्याची शक्यता अधिक असते.
Lonavala Shocking Video
ही दुर्दैवी घटना पर्यटकांसाठी एक धडा ठरावी आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करूनच पावसाचा आनंद घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लोणावळ्यातील भूशी डॅम आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील धबधबे हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे, मात्र या धबधब्यांच्या पाण्याचा आनंद घेताना सुरक्षिततेचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.Lonavala Shocking Video
पाहा व्हिडिओ: