Mahadbt Farmer portal: शेतकरी पोर्टल वर लॉगिन करा आणि सर्व योजनांचा लाभ घ्या(MahaDBT Farmer portal )
Mahadbt Farmer Login: महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी (Mahadbt Farmer portal) पोर्टल सुरु केले आहे.
मुंबई: महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी (Mahadbt Farmer Portal) पोर्टल सुरु केले आहे, जे शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ देण्यासाठी एक महत्वपूर्ण उपक्रम ठरले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करता येणार आहे तसेच त्यांचे जीवनमान उंचावले जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी योजना एकत्रित मंचावर
पूर्वी शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी विविध पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागत असे. यामुळे अनेक शेतकरी योजनांच्या लाभापासून वंचित राहायचे. या समस्येचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने महाडीबीटी पोर्टल (Mahadbt Farmer portal) सुरु केले आहे. या पोर्टलवर राज्यातील सर्व कृषी योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पोर्टलवर जाऊन अर्ज करण्याची गरज नाही.
योजनांचा लाभ व नोंदणी प्रक्रिया
महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना (Mahadbt Farmer Portal) एकदाच नोंदणी करून भविष्यात सुरू करण्यात येणाऱ्या सर्व कृषी योजनांचा लाभ घेता येईल. शेतकरी कोणत्याही वेळी, कुठूनही या पोर्टलवर नोंदणी करून अर्ज करू शकतात. अर्जाची सद्यस्थिती पाहण्यासाठी त्यांना वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड देखील प्रदान करण्यात येणार आहे.
महाडीबीटी योजना सूची
महाडीबीटी पोर्टलवर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना,कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान यांसारख्या अनेक योजनांचा समावेश करण्यात आला आहे.शेतकऱ्यांसाठी या योजनांच्या माध्यमातून तुषार व ठिबक सिंचनासाठी अनुदान, कृषी यंत्र/अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य, बियाणे वितरण, पंप संच, पाईप, शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण, पीव्हीसी पाईप्स यांसारखे विविध लाभ उपलब्ध असतील.
उद्दिष्टे व फायदे
महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची त्वरित आर्थिक भरपाई मिळणे शक्य होणार आहे. या पोर्टलमुळे शासकीय वितरण प्रणालीत पारदर्शकता वाढणार असून शेतकऱ्यांना विविध कार्यालयांच्या फेर्या मारण्याची गरज भासणार नाही.(Mahadbt Farmer Portal)
शेतकऱ्यांचे आर्थिक स्वावलंबन
महाडीबीटी पोर्टल हा महाराष्ट्र शासनाचा एक अग्रगण्य उपक्रम असून, शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंबन आणि सशक्तीकरणासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणार आहेत.