Maharashtra Politics: कर्जमाफी होईलच, पण शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वीज मोफत देणार? जिल्हा बँक अध्यक्षांचा प्रस्ताव, निवडणुकांमुळे मोठ्या हालचाली
Maharashtra Politics: आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत कांदा, दूध दरवाढ आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांमुळे महायुतीला मोठा फटका बसला होता. यामुळे आता सरकारने शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी पक्षश्रेष्ठींकडे एका महत्त्वपूर्ण प्रस्तावाची मागणी केली आहे. “गेल्या वर्षाचे पीककर्ज माफ करा, पण शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वीज मोफत द्या,” अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय, दूधाचे पाच रुपये अनुदान सलग सहा महिने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचाही प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.
Maharashtra politics
शिवाजी कर्डिले म्हणाले, “शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी घेतलेले पीक कर्ज माफ करणे अत्यावश्यक आहे. खरीप आणि रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याने कर्जाचे ओझे वाढले आहे. तसेच, वीज बिल भरू शकत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची वीजबिले थकली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कायमस्वरूपी मोफत वीज देण्याची मागणी आम्ही महायुतीच्या नेत्यांकडे केली आहे.”
दूध अनुदानाविषयी बोलताना कर्डिले म्हणाले, “दूधाचे पाच रुपये अनुदान देण्यात आले होते, परंतु त्यात खूप जाचक अटी होत्या. त्यामुळे अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा केले होते. त्यानुसार, दूधाचे पाच रुपये अनुदान सलग सहा महिने शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करावे, अशी आमची मागणी आहे.”
कर्जमाफीबाबत सहकारमंत्र्यांनी बँकांकडून पीककर्जाची माहिती घेतली आहे. नुकतीच राज्यातील सर्व जिल्हा बँकांचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक यांची बैठक सहकारमंत्र्यांकडे झाली. यावेळी गेल्या वर्षी दिलेले पीककर्ज आणि यंदा वाटप केलेले पीककर्ज यांची माहिती मंत्र्यांनी घेतली आहे. त्यामुळे ही पीककर्जमाफीसाठी आहे की नाही, याबाबत मात्र कर्डिले यांनी अद्याप स्पष्टता दिलेली नाही.maharashtra politics
शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांच्या मागण्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कितपत पूर्ण केल्या जातील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सरकारच्या या हालचालींमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का, याबाबत सर्वांचे लक्ष लागले आहे.
🔗 आणखी पाहा: Maharashtra Politics: OBC नेत्यांच्या शिष्टमंडळात आणखी एका मंत्र्यांची एन्ट्री, मुख्यमंत्र्यांचा फोन येताच…
🔗 👉🏻आमच्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन करा 👈🏻