Maharashtra women missing
महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आणखी एका मुद्द्यावर राजकारण गरम होण्याची अंदाज वर्तवला जात आहे तो म्हणजे महिला मिसिंग केस..
एक धक्का एक बातमी समोर येत आहे एका व्यक्तीने 2019 पासून 100882 महिला गायब झाल्याचे याचिका कोर्टात दाखल केली असून यावर लवकरच कोर्ट करणार हस्तक्षेप..
त्यामुळे आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा आणखी रंग लावणार आहे.
सरकारच्या कोषागार विभागात काम करणारे माजी सैनिक शहाजी जगताप यांनी एडवोकेट मंजिरी पारसनीस यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
पावसामुळे झालेल्या नुकसानीचे 60 टक्के पंचनामे पूर्ण… लवकरच मिळणार मदत
Maharashtra women missing
दिल्लीतील अफ्तफा प्रकरण, किंवा मुंबईतील विरार रोडच्या मनोज सहाने प्रकरणामुळे याची देशभरातच चर्चा होत राहिली.
तर याच बरोबर केरला द स्टोरी या सारखी घटना महाराष्ट्रात तर सुरू नाही ना याचा संशय यायला काही वेळ लागत नाही….
मा. न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्रातील गृह विभागाच्या रिपोर्टच्या आधारावर आणि त्यांची स्वतःची मुलगी बेपत्ता झाली होती परंतु त्यांनी पोलीस ठाण्यात कंप्लेंट केली असता.
त्यांना असे सांगण्यात आले की तिने एका मुलासंग लव्ह मॅरेज केले असून ती व्यवस्थित आहे.
त्यांची मुलगी सांगलीमध्ये बीएससी चे शिक्षण घेत असताना बेपत्ता झाली असताना त्यांनी सांगलीच्या संजय नगर पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली.
त्यानंतर त्यांना असे समजले की त्यांच्या मुलीने इस्लाम धर्म स्वीकारून लग्न केल्याची माहिती जगतापरावांना मिळाली.
Maharashtra women missing
लग्न केल्यानंतर फक्त पाच मिनिट मी मुलींना भेटलो होतो त्यानंतर तिचं काय झालं आणि तिचा आमच्या कुटुंबाशी संबंध तोडला गेला.
तिचे काय झाले याची काहीही माहिती मला नाही.
मुलगी सज्ञान असल्याने पोलीस तिला घरी आणू देऊ शकत नाहीत. असे दुःख जगताप्रावानी व्यक्त केले.
केंद्रीय ग्रह विभागाने प्रकाशित केलेल्या रिपोर्टनुसार एक-दोन नाही तर 100882 मुली/महिला बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली.
तर याचिका करते जगताप यांच्या म्हणण्याप्रमाणे यासाठी एक स्पेशल कमिटी तयार करून याचा शोध व्हायला हवा असे याचिका करते जगताप यांचे म्हणणे आहे.
याचिक करते जगताप यांच्या म्हणण्याप्रमाणे ज्या मुली आणि महिला बेपत्ता झाले आहेत त्यांचा वापर अवैध कामासाठी होत आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
या अगोदरच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे 2019 मध्ये मिसिंग झालेल्या महिला विषयी पत्र पाठवून याची सूचना दिली होती.
परंतु आता गृह विभागाच्या आकडेवारीचा हवाला घेऊन आणि त्यांच्या मुलीशी झालेली घटना याचा सर्व उल्लेख करून त्यांनी मा.न्यायालयात धाव घेतली आहे.
तर या सुनावणी दरम्यान कोण कोणते तथ्य समोर येणार आहेत हे आपण पाहणारच आहोत.
अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
