Mahashivratri 2024 – आज तुम्हाला महाशिवरात्रीची अतिशय शास्त्रोक्त माहिती देणार आहे. तेव्हा माहिती पूर्ण वाचा महाशिवरात्रीच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये जे जे प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या माहितीतून मिळून जातील. माहिती वाचल्यानंतर सर्वांनी कमेंट्स मध्ये लिहा ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला तर मग माहितीला सुरुवात करुया.
सुरुवातीला आपण महाशिवरात्री शब्दाचा अर्थ जाणून घेऊया पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस असतो. असं म्हटलं जातं शिवरात्रीच्या एक प्रहरी शिवशंकर विश्रांती घेतात शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असं म्हटलं जातं महाशिवरात्री हा एक हिंदूंचा सण आहे.
तो माग महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येतो. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशी ही शिवरात्री असते. मात्र माग महिन्यातील शिवरात्रीचा मटका सर्वात मोठा असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. भगवान शंकरांची आराधना व प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो. तर इंग्रजी महिन्यांप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येत असतो. संस्कृत पुराण साहित्यापैकी अग्निपुराण शिवपुराण पद्मपुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितलेले आहे. या दिवशी बेलाची पाने वाहून भगवान शिव शंकरांची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे.
महाशिवरात्रीला जागरणाचा खूप महत्त्व आहे. या दिवशी शंकर-पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत दीड दिवसाचा असतं त्यामुळे त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी हे व्रत समाप्त होतं. दुसऱ्या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशीर्वाद घेऊन शिवरात्रीच्या व्रताचा समारोप घेतात. महादेवाच्या मंदिरांमध्ये शिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविक भक्तांची गर्दी दिसून येते. ज्या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा या दिवशी खूप जास्त गर्दी होते.
शिवभक्त तिथे दर्शनाला येतात भगवान शिवाचं ज्या ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे. तिथे मोठे यात्रा सुद्धा भरतात भगवान शिवशंकरांना 108 बेलपत्र वाहून शिवनामावली देखील उच्चारली जाते. महाशिवरात्रीला काटे धोत्र्याचे फुल भगवान शिव शंकरांना वाहण्याची परंपरा आहे. यावेळी आपण धोत्र्याच्या फळाकडे एक विषारी फळ म्हणून बघतो. मात्र भगवान शिव शंकरांना धोत्र्याचे फळ सुद्धा अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला शिवकृपा प्राप्त होते. या दिवशी आपण ओम नमः शिवाय किंवा भगवान शिव शंकरांचा जो काही जागृत मंत्र असतो. त्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा तुम्ही हा जो मंत्र असतो. तो रुद्राक्षाच्या माळेवर सुद्धा करू शकता किंवा मग दोन्ही हात जोडून शिवपिंडीकडे बघत बघत किंवा शिवपिंडीवर अभिषेक करत करत जरी केला तरी सुद्धा याचा आपल्याला भरपूर लाभ प्राप्त होतो.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवभक्त उपवास करतात. त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये दूध, फळ, कंदमूळ असा आहार घेतात. महाशिवरात्रीला कवठाचा फळ खाण्याला त्याचबरोबर खजूर खाण्याला सुद्धा विशेष महत्त्व मानलं जातं. बऱ्याच ठिकाणी आंबट जी फळ असतात ती वर्ज केली जातात. पण काही ठिकाणी उलट महाशिवरात्रीला आपण आंबट फळ खाऊयात म्हणूनच कवठाच्या फळाला सुद्धा विशेष महत्त्व दिले जातं. भारताच्या विविध राज्यांमध्ये हा सण साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतभर विविध तीर्थक्षेत्र तसेच प्रामुख्याने बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थानी विशेष यात्रा भारतात शिवरात्री हा सण शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा सण आहे.
Mahashivratri 2024
महाशिवरात्रीचा उपवास पूजा जागरण या व्रताची तीन अंग आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभक्त राहावं शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या असे विधान आहे. याला शिवरात्री पूजा किंवा याम पूजा असं म्हटलं जातं. प्रत्येक पूजेत देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्व आकर्ष्ट करणारा बेल पांढरी फुल, रुद्राक्षांच्या माळा शाळून का शिवपिंडीवर वाहव्यात तसेच तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्याने शिवाला ओवाळणी घालावी. तरी या दिवशी तुम्ही तांदळाच्या पिठाचे 26 दिवे करून पिंडीच्या सर्व बाजूंनी ते लावू शकतात.
याला शिवाची ओवाळणी असं म्हटलं जातं. महाशिवरात्री शब्दांमध्येच तिचा अर्थ दडलेला आहे, की या दिवशी दिवसापेक्षा रात्रीची जी पूजा असते ती अतिशय फलदायी किंवा शुभदायी मानली जाते. यामुळे माणसाच्या सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो. आपल्याला शिवलोकांची प्राप्ती होते. खरंतर चार प्रहराची जी पूजा आहे. ती अर्थ, धर्म, काम, मोक्ष या चार उद्देशांसाठी केली जाते. चतुर्दशी बऱ्याच वेळा दोन दिवसात विभागलेली असते, जर समजा त्रयोदशीच्या मध्यरात्रीत चतुर्दशी येत असेल तर ती शिवरात्र मानली जाते.
यावरून शिवरात्रीचे कालनिर्णय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्त्व आहे. हे स्पष्ट होतं त्यामुळेच शिवरात्रीचे त्यामुळेच शिवरात्रीचे कालनिर्णय करताना बऱ्याच वेळा मतभेद सुद्धा होतात. महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते पंचगव्य म्हणजे गाईचं दूध तूप गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक केला जातो. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप दिला जातो. त्यानंतर धोत्रा तसेच बेलाची पाने आणि पांढरी फुल वाहून देवाची पूजा केली जाते.
Mahashivratri 2024 in Marathi
भगवान शिव शंकरांना भोळा शंकरा असं म्हटलं जातं. उपासना केल्यावर त्वरित प्रसन्न होणारा आणि इच्छित फळ देणारा हा महादेव सर्वांचे कल्याण करणार आहे. शिवपुराणात अशा अनेक कथा सुद्धा आहेत. सर्व देवतांमध्ये भगवान शिवाचे महत्व अत्याधिक असल्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र वातावरणात साजरा केला जातो. अतिशय मंगलमय दिवस म्हणून महाशिवरात्री सण साजरा केला जातो.
महाशिवरात्रीच्या अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत. त्यापैकीच ही एक कथा आहे. ज्यावेळी समुद्रमंथन झालं त्यावेळी सृष्टीशी निगडित सर्व महत्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली परंतु त्याचवेळी समुद्रमंथनातून हलाहल विष देखील बाहेर पडलं या विषयात ब्रम्हांडाला नष्ट करण्याची शक्ती होती. आणि या विषयाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिव शंकरांमध्येच होती. त्यामुळे शिवशंकरांनी हे विष प्राशन केलं आणि ब्रम्हांडाला वाचवलं पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि संपूर्ण देहाचा दाह व्हायला लागला वैद्यांनी भगवान शिवशंकरांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला.
सर्व देवांनी भगवान शिव शंकरांना बरं वाटावं म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली. जेणेकरून त्यांना झोप लागणार नाही सकाळी महादेव यांनी सर्वांना आशीर्वाद दिला. या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असं नाव पडलं असं देखील म्हटलं जातं. शिवशंकरांच्या अंगाच्या होत असलेल्या दहामुळे भगवान शिवांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केलं होतं. महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात. भगवान शिवाचे शिवलीलामृत महारुद्र गायन भजन इत्यादींचा आयोजन केलं जातं. भगवान शिवांच दर्शन घेऊन त्यांचा कृपाप्रसाद मिळवण्याकरता आराधना देखील केली जाते.
माहिती चांगली वाटली तर नक्की शेअर करा. धन्यवाद..!
महाशिवरात्री संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा