व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Manoj Jarange: मनोज जरांगे,”मी शेवटच्या घटकापर्यंत…” – मनोज जरांगेंचं मराठा समाजाला भावनिक आवाहन

By Rohit K

Published on:

Manoj Jarange

Manoj Jarange: मनोज जरांगे,”मी शेवटच्या घटकापर्यंत…” – मनोज जरांगेंचं मराठा समाजाला भावनिक आवाहन

Manoj Jarange:मनोज जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त भावुक अपील

राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापलेला आहे. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange यांनी मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी अनेकदा उपोषण केले, मात्र ओबीसी समाजाने त्याला विरोध केला. यासंदर्भात सर्वपक्षीय बैठकही बोलावण्यात आली होती, पण त्यात काहीही ठोस निष्कर्ष निघाला नाही. त्यामुळे सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

वाढदिवसाचा प्रसंग आणि मनोज जरांगे यांचे अश्रू

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

मनोज जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला संबोधित करताना त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, “मी तुमच्यासाठी खंबीर आहे. माझी समाजाकडे काहीही अपेक्षा नाही. तुमचे पोरं मोठे करण्यासाठी मी जीव तळ हातावर घेतला आहे. मी शेवटच्या घटकापर्यंत मराठा समाजाला कधीही सोडणार नाही”, असं म्हणत मनोज जरांगेंना अश्रू अनावर झाले.

नक्की पाहा :Amol Mitkari : “आता एकतर ते जिवंत राहतील नाही तर मी”, अमोल मिटकरींचा मनसेच्या नेत्यांना इशारा

Manoj Jarange:मनोज जरांगे यांचे भावनिक भाषण

मनोज जरांगे म्हणाले, “कोणताही पक्ष आणि तुमचा नेता मराठ्यांच्या जातीला आणि तुमच्या मुलांना कधीच मोठं करणार नाही. तुम्ही फक्त जातीला बाप माना, नेत्यांना बाप मानायचं बंद करा. तुमचे मुलं तुम्हाला आयपीएस आणि आयएएस दर्जाचे अधिकारी पाहायचे असतील तर स्वतःचे मुलं मोठे करण्यासाठी लढायला लागा. त्यानंतर जगाच्या पाठीवर सर्वात श्रीमंत आणि प्रगतशील जात म्हणून फक्त मराठ्यांची जात असेल.”

“मी खंबीर आणि कणखर आहे. मी मागे हटत नाही. तुम्ही काळजी करू नका. मला फक्त उपोषणाच्या आणि शरीराच्या वेदना आहेत. बाकीच्या वेदनांना मी खंबीर आहे. माझी समाजाकडून काहीही अपेक्षा नाही. मला समाजाचा एक रुपयाही नको. फक्त समाजाचे पोरं मोठे करण्यासाठी मी जीव तळ हातावर घेतलेला आहे. संपूर्ण सरकार माझ्या मागे लागलंय. विरोधी पक्ष माझ्या मागे लागला आहे. पण मी मागे हटत नाही आणि हटणारही नाही.”

शेवटचा संदेश आणि आवाहन

मनोज जरांगे पुढे म्हणाले, “मी शेवटचं समाजाला सांगतो की, माझ्यावर सरकारने कधी हल्ला केला तर, कारण मी कुठेही फिरत असतो. मी आजच पुण्याला जाणार आहे. कुठेही जिवघेणा हल्ला केला आणि मी रक्ताच्या थारोळ्यात पडलो तरी मरताना माझ्या तोंडात शब्द फक्त मराठा आणि मराठा आरक्षण हेच असतील. मी शेवटच्या घटका मोजेल पण मी कधीही मराठा समाजाला सोडणार नाही. मला खूप वेदना होयला लागल्या तरीही मी समाजाला सोडून देतो, असं म्हणणार नाही. मराठा समाजाची शान मी कधीही कमी होऊ देणार नाही.”

मनोज जरांगे यांच्या या भावनिक आवाहनामुळे मराठा समाजात नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यांचे शब्द समाजाच्या मनाला भिडले आहेत आणि त्यांचं आवाहन समाजाला नव्या उमेदीने प्रेरित करत आहे.Manoj Jarange

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews