Manu Bhaker
कोण आहे मनू भाकर जिने ऑलम्पिक मध्ये कांस्यपदकाला घातली गवसणी..
सध्या पॅरिसमध्ये ऑलम्पिक स्पर्धा चालू आहे यामध्ये भारताचे बरेच प्लेयर खेळण्यासाठी केले आहेत त्यामधील पहिले मेडल मिळवून देण्याचे काम मनू भाकर या प्लेअर ने केले आहे.
व ऑलम्पिक मध्ये भारताच्या मेडलची नोंद केली आहे यामुळे भारताचे नाव उंचावले आहे त्यामुळे सध्या मनु भाकर खूप चर्चेत आहे.
काय आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्यामुळे प्रत्येक पुरुष व महिलांना मिळतात 3000 रुपये महिना कसा घ्याल त्याचा लाभ
Manu Bhaker
मनू ची कामगिरी
मनू ची कामगिरी सोळा वर्षापासूनच सुरू झाली आहे म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसत असतात त्याचप्रमाणे मनुची पहिल्यापासून असणारे खेळा प्रती अप्रतिम इच्छा ने तिला आज मेडल मिळवून दिले आहे.
मनू ने 16 यावर्षीच मेडल मिळवणे चालू केले आहे कारण तिला पहिल्यांदा 16 व्या वर्षी भारतीय क्रीडा महासंघाच्या स्पर्धेत 2 गोल्ड मेडल मिळाले.
पहिले गोल्ड मेडल 10 मिटर एअर पिस्तूल (महिला) या प्रकारात तर दुसरे गोल्ड मेडल 10हा मीटर पिस्तूल मिश्र स्पर्धा यामध्ये मिळवले.
एकाच दिवशी दोन गोल्ड मेडल मिळवण्याचा विक्रम ही तिच्या नावे आहे.
मुलीसाठी आईने सोडली सरकारी नोकरी
जो व्यक्ती यशस्वी होतो त्या यशाचे श्रेय त्याचे एकट्याचे नसून त्याला घडवण्यात बऱ्याच लोकांचे सहाय्य असते त्यातीलच एक व्यक्ती म्हणजे तिची स्वतःची आई..
मनू ने (फर्स्ट) पहिल्या वेळेस शाळेमध्ये नेमबाजी स्पर्धेत भाग घेतला आणि त्यामध्ये केलेले अचूक निशानेबाजी हे पाहून सर्व आश्चर्यचकित झाले.
त्यानंतर तिने सर्व निशाणी बाजी संबंधित सर्व प्रशिक्षण पूर्ण केले आणि विविध स्पर्धेत भाग घेऊ लागली.
Manu Bhaker
परंतु मनूला परवानाधारक बंदूक घेऊन सार्वजनिक वाहनात प्रवास करता येत नव्हता आणि वय कमी असल्यामुळे गाडी चालवण्याचा तिला परवाना मिळत नव्हता किंवा गाडी चालू शकत नव्हती.
त्यामुळे तिच्या आईने स्वतःची मुख्याध्यापिकाची नोकरी सोडून तिच्यासोबत सराव करण्यासाठी जाऊ लागल्या.
बंदूक परवाना मिळवण्यासाठी ही करावे लागले संघर्ष
साधारणता बंदूक परवाना साठी तुम्ही अर्ज केल्यानंतर हा अर्ज आठ ते दहा दिवसात मंजूर होतो व बंदूक मिळत असते .
परंतु त्यांचे वडील सांगतात की मला बंदूक आणण्यासाठी दीड महिन्याचा कालावधी लागला
कारण मी बंदूक आणण्यासाठी अर्ज केला होता आणि त्या अर्जामध्ये बंदूक घेण्यामागचे कारण स्वरक्षण असे दिले होते त्यामुळे जिल्हा प्रशासनाने माझा अर्ज रद्द केला.
परंतु हा मुद्दा सोशल मीडियाने उचलून धरल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्याची चौकशी करून तो अर्ज मंजूर करण्यात आला.
कसा झाला मनुचा पॅरिस ऑलिम्पिक प्रवास
सर्वात अगोदर ऑलिंपिक मध्ये पात्रता फेरी असते या पात्रता फेरीमध्ये उत्तीर्ण झाल्याच्या नंतरच पुढे जाण्याचा चान्स मिळतो.
या पात्रता खेळाडूच्या नंबर मध्ये मनूचा तिसरा नंबर होता.
म्हणून पात्रता फेरीच्या दुसऱ्या 2 सिरीज मध्ये प्रत्येकी 97 गुण मिळवले तर तिसऱ्या फेरीच्या सिरीज मध्ये 98 गुण मिळवून तिसरे स्थान मिळवले.
पाचव्या सिरीज मध्ये आठ गुण मिळवले या फेरीव्यतिरिक्त तिचे सर्व फेऱ्यांमध्ये चांगले गुण आले व तिला कास्य पदक मिळाले.
अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
