व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Maharashtra Milk Rate: दुधाला 34 रुपये दराची घोषणा अनिर्वाह; दुध उत्पादक शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया

By Rohit K

Published on:

Maharashtra Milk Rate: दुधाला 34 रुपये दराची घोषणा अनिर्वाह; दुध उत्पादक शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया

 

Maharashtra Milk Rate: दुधाचे दर (milk rate) सातत्याने कोसळत असल्याने महाराष्ट्रातील दुध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुधाला किमान 34 रुपये दर देण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात आज दुधाला केवळ 25 रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप उफाळून आला आहे.

 

किसान सभेचा एल्गार: डॉ. अजित नवलेंचा इशारा

दुध (मिल्क) उत्पादकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी सरकारला कडक शब्दांत इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, “राज्य सरकारने तातडीने दुध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत, अन्यथा पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाची तयारी करावी लागेल.”

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

 

अनुदानाचे आव्हान: वाढत्या तोट्याचे चित्र

दुध आंदोलनाच्या काळात राज्य सरकारने दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदानाची घोषणा केली होती. मात्र, हे अनुदान केवळ 6 आठवडे, म्हणजेच दोन महिन्यांसाठीच दिले गेले. पुढील चार महिन्यांपासून हे अनुदान बंद करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा तोटा वाढत असून, उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे.

 

मागण्या आणि उपाययोजना

किसान सभा आणि दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने काही ठोस मागण्या मांडल्या आहेत:

Maharashtra Milk Rate

 1)प्रतिलिटर 10 रुपये अनुदान:  सध्याच्या 5 रुपये अनुदानात वाढ करून किमान 10 रुपये अनुदान दिले जावे.

 2)थकीत अनुदानाची तत्काळ भरपाई:  अनुदान बंद झालेल्या काळातील थकीत अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे.

 3)पशुखाद्याचे दर कमी करणे: राज्यातील वाढत्या पशुखाद्याच्या दरावर नियंत्रण आणणे आणि चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करणे.

 4)दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना:

दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत चारा आणि पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करणे.

 

 शेतकऱ्यांची तळमळ आणि आशा

दुष्काळ, चाऱ्याची टंचाई, औषधोपचाराच्या वाढत्या किंमती, आणि उत्पादन खर्चाच्या वाढीमुळे दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत सरकारने तातडीने दखल घेऊन योग्य उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, दुध उत्पादक शेतकऱ्यांचा असंतोष आणखी वाढून पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाचे रूप घेऊ शकतो. 

दुधा विषयक व्हिडिओ द्वारा बातमी:

 Maharashtra Milk Rate: राज्य सरकार आणि दुग्ध विकास

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने या समस्येची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय देणे अत्यंत गरजेचे आहे. राज्यातील दुध उत्पादक शेतकरी आशेने सरकारकडे पाहत आहेत, आणि त्यांच्या या तळमळीला न्याय मिळणे आवश्यक आहे.

🔗आणखी पाहा:Gold Silver Rate Today: सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण: निवडणुकीच्या निकालापूर्वीच धक्का (Sone Chandi Che Bhav)

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews