राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर: राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आणि विविध संघटना Milk Rate ४० रुपये प्रति लिटर मिळावा अशी मागणी करत आहेत. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने कोतुळ येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा आजचा २७ वा दिवस आहे. किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी ‘शेतकऱ्यांचे मेगाब्लॉक’ आंदोलनाचा इशारा दिला होता.
सरकारच्या निर्णयानुसार दूध प्रक्रिया केंद्रांनी Milk Rate द्यावा लागेल. जर त्यांनी ते दिले नाहीत, तर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत.
राज्यात दूध भेसळीचा मुद्दा गंभीर बनला आहे आणि याबाबत राज्य सरकार कठोर कायदा करण्याच्या तयारीत आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटले आहे की, भेसळ करणाऱ्यांविरोधात एमपीडीए लावला जाईल आणि त्यांना जामीन मिळू नये, अशी कठोर तरतूद कायद्यात केली जाईल. प्रस्तावित कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अन्न व औषध प्रशासन विभाग, डेयरी विभाग आणि पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांचे एकत्रित पथक तयार करण्यात येणार आहे.
या निर्णयानुसार, दूध संकलन केंद्रांना शेतकऱ्यांच्या दुधाला ठरलेला Milk Rate द्यावा लागेल. पण सरकारच्या या निर्णयाचे स्वागत दूध उत्पादक शेतकरी करतात की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी पाहा:Gold-Silver Price: महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने आले पुन्हा रंगात, चांदीची पण उंच उडी