व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Mudra Loan In Marathi 2024: लघु उद्योगांना आर्थिक पाठबळ || संपूर्ण माहिती !

By Rohit K

Published on:

Mudra Loan In Marathi 2024: लघु उद्योगांना आर्थिक पाठबळ

प्रधानमंत्री मुद्रा योजना काय आहे?

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ही योजना २०१५ साली सुरू करण्यात आली. या योजनेतर्गत, १० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. हे कर्ज तीन मुख्य श्रेणींमध्ये विभागले जाते:

  • शिशू कर्ज: ज्यांनी व्यवसायाची सुरुवात केली आहे, त्यांना ५०,००० रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.
  • किशोर कर्ज: ज्यांचा व्यवसाय सुरू आहे पण अद्याप पूर्णपणे स्थापित झाला नाही, त्यांना ५०,००० ते ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.
  • तरुण कर्ज: ज्यांनी व्यवसाय स्थापित केला आहे आणि आता विस्तार करायचा आहे, त्यांना ५ ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.

मुद्रा लोन साठी लागणारी कागदपत्रे

“Mudra Loan In Marathi 2024” अंतर्गत अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत:

  • मतदान ओळखपत्र, आधार कार्ड
  • वीज बिल किंवा घर खरेदी पावती
  • व्यवसाय परवाना आणि स्थायी पत्ता
  • मागील ६ महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • मशिनरी आणि मालमत्तेचे कोटेशन
  • अर्जदाराचे फोटो

कर्ज घेण्याचे फायदे

या योजनेत, जामीन किंवा गहाण ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे लघु उद्योजकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरते. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार या योजनेचा लाभ घेऊ शकतात, फक्त ते बँकेचे थकबाकीदार नसावेत.

कर्ज मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा?

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

बँक ऑफ बडोदा किंवा इतर सरकारी बँकांमधून “Mudra Loan In Marathi 2024” अंतर्गत कर्ज घेण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करता येईल. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्जाची सविस्तर माहिती मिळवता येईल.

हे ही वाचा:Phone Pay वरून आता 5 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन, फक्त 10 मिनिटांत मिळवा Phonepe Personal Loan

Apply for Digital Mudra Loan Online

बँक ऑफ बडोदा बँकेकडून video पाहून रु. 50 हजार ते 10 लाखांपर्यंत प्रधानमंत्री मुद्रा लोन मिळवण्यासाठी  हा व्हिडिओ पाहा –

शेतकरी बंधूंनो , बँक ऑफ बडोदा प्रधानमंत्री मुद्रा लोन 2024 – या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी , तुमच्या मनातील शंका , योजनेबाबत काही प्रश्न असतील यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँक ऑफ बडोदा या बँकेच्या शाखेला भेट द्यावी तेथील बँक मॅनेजर सोबत या योजनेबाबत सविस्तर चर्चा करावी व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज करून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

बँक ऑफ बडोदा बँकेकडून रु. 50 हजार ते 10 लाखांपर्यंत प्रधानमंत्री मुद्रा लोन मिळवण्यासाठी/ ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ->> येथे क्लिक करावे. 

नागरिकांचे सामान्य प्रश्न (MUDRA YOJANA)

मुद्रा योजना (MUDRA YOJANA) म्हणजे काय?

प्रधानमंत्री मुद्रा योजना (Mudra Yojana) ही 8 एप्रिल 2015 रोजी माननीय पंतप्रधानांनी सुरू केलेली एक योजना आहे. या योजनेत बिगर कॉर्पोरेट, बिगर शेती लघु आणि सूक्ष्म उद्योगांना 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या कर्जांना पीएमएमवाय अंतर्गत मुद्रा कर्ज म्हणून ओळखले जाते आणि ही कर्जे व्यावसायिक बँका, आरआरबी, स्मॉल फायनान्स बँका, एमएफआई आणि एनबीएफसी द्वारे दिली जातात. या योजनेअंतर्गत तीन प्रकारची कर्जे आहेत: ‘शिशु’, ‘किशोर’ आणि ‘तरुण’ जे कर्जदारांच्या व्यवसायाच्या प्रगतीनुसार देण्यात येतात.

योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी कोण पात्र आहेत?

मालकी/भागीदारी कंपन्या, लहान उत्पादन यूनिट, सेवा क्षेत्रातील यूनिट्स, दुकानदार, फळे/भाजी विक्रेते, ट्रक ऑपरेटर, अन्न-सेवा युनिट्स, दुरुस्तीची दुकाने, मशीन ऑपरेटर, लघु उद्योग, कारागीर, अन्न प्रक्रिया करणारे आणि इतर.

मुद्रा कर्जावर व्याजदर किती असतो?

मुद्रा कर्जावरचे व्याजदर नियंत्रणमुक्त आहेत आणि बँकांना वाजवी व्याजदर आकारण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मुद्रा योजनेत सुरक्षा ठेव किंवा गहाणखत आवश्यक आहे का?

नाही, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सूक्ष्म आणि लघु उद्योगांना दिलेल्या 10 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी बँकांना सुरक्षा ठेव किंवा गहाणखत न घेण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्व बँका मुद्रा लोन देतात का?

होय, वित्तीय सेवा विभागाने (डीएफएस) 14 मे 2015 रोजीच्या पत्राद्वारे सर्व पीएसबी, आरआरबी आणि स्मॉल फायनान्स बँकांना पीएमएमवाय लागू करण्याबाबत सूचना दिल्या आहेत आणि योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा सल्ला दिला आहे.

मुद्रा अंतर्गत कोणतेही अनुदान किंवा सबसिडी आहे का?

पीएमएमवाय अंतर्गत दिलेल्या कर्जासाठी कोणतेही अनुदान किंवा सबसिडी उपलब्ध नाही.

उपसंहार

शेतकरी किंवा लघु उद्योजकांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना २०२४ ही एक सुवर्णसंधी आहे. या योजनेद्वारे तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक मदतीचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे जर तुम्हीही लघु उद्योग सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजच या योजनेचा लाभ घ्या.पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेचा टोल फ्री नंबर: महाराष्ट्रासाठी Mudra loan toll free number Maharashtra – १८००-१०२-२६३६ हा आहे. याशिवाय प्रत्येक राज्याचे स्वतंत्र टोल फ्री नंबर pdf स्वरूपात पाहण्यासाठी -> इथे क्लिक करा. तर, मुद्रा योनजेचा राष्ट्रीय टोल फ्री नंबर १८००-१८०-११११ व १८००-११-०००१ हा आहे.

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews