Mukhyamantri Vayoshree Yojna: मुख्यमंत्री वयोश्री योजना: ज्येष्ठांसाठी सरकारची नवी योजना, मिळणार 3000 रुपये आणि आवश्यक उपकरणं
Mukhyamantri Vayoshree Yojna:मुख्यमंत्री वयोश्री योजना,65 वर्षांवरील नागरिकांना 3000 रुपये
महाराष्ट्र सरकारने 2024 च्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवी योजना जाहीर केली आहे. *मुख्यमंत्री वयोश्री योजना* Mukhyamantri Vayoshree Yojna या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत आणि आवश्यक उपकरणं देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, या योजनेसाठी 480 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
वयोश्री योजना Mukhyamantri Vayoshree Yojna काय आहे?
वयोमानामुळे जेव्हा ज्येष्ठ नागरिकांना ऐकण्यात, दिसण्यात किंवा चालण्यात अडचणी येतात, तेव्हा त्यांना या योजनेअंतर्गत मदत मिळणार आहे. या योजनेद्वारे, 65 वर्षांवरील नागरिकांना 3000 रुपये आर्थिक मदत दिली जाईल. याशिवाय, त्यांना
- चष्मा,
- श्रवणयंत्र,
- स्टिक,
- व्हीलचेअर,
- ग्रीवा कॉलर,
- फोल्डिंग वॉकर इत्यादी गरजेची उपकरणं देखील पुरवली जातील.
वयोश्री योजना केव्हा जाहीर झाली?
महाराष्ट्रात 5 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी *मुख्यमंत्री वयोश्री योजना*Mukhyamantri Vayoshree Yojna जाहीर केली होती. योजनेचे उद्दिष्ट म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन जीवनात त्यांच्या गरजा पूर्ण करणे आणि त्यांना शारीरिक त्रासातून दिलासा देणे.
योजनेसाठी पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
योजनेसाठी अर्ज करणारा व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याचे वय 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांपेक्षा कमी असावे आणि शारीरिक किंवा मानसिक त्रास असावा. अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, या योजनेअंतर्गत किमान 30% महिलांना लाभ दिला जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे
– आधार कार्ड
– ओळखपत्र
– उत्पन्न प्रमाणपत्र
– जात प्रमाणपत्र
– स्वयंघोषणा प्रमाणपत्र
– आरोग्य समस्येचे प्रमाणपत्र
– बँक खाते पासबुक
– मोबाईल नंबर
– पासपोर्ट साईज फोटो
वरील सर्व कागदपत्रांसह समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करायचा आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना Mukhyamantri Vayoshree Yojna ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे. ही योजना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना जीवनातील समस्या सोडवण्यासाठी मदत करते.