Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 | काय आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना? कसा घ्याल योजनेचा लाभ?
- चालण्याची काठी
- कोपर क्रचेस
- वॉकर / क्रॅचेस
- ट्रायपॉड्स/क्वाडपॉड्स
- श्रवणयंत्र
- व्हीलचेअर
- कृत्रिम दात
- चष्मा
योजनेसाठी पात्रतेचे निकष (Mukhyamantri Vayoshri Yojana 2024)
1. 31 डिसेंबर, 2023 अखेर वयाची 65 वर्ष पूर्ण केलेली असावीत.
2. आधारकार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधारकार्डसाठी अर्ज केलेला असावा.
3. जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशनकार्ड असणे आवश्यक आहे.
4. लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रुपये 2 लाखाच्या आत असावे.
5. लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30 टक्के महिला असतील.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
1. आधारकार्ड
2. मतदानकार्ड
3. राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक छायाकिंत प्रत
4. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
5. स्वंय घोषणापत्र
6. शासनाने ओळख पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे
लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह 16 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज संबंधित तालुक्यांच्या गट विकास अधिकारी, तालुका पंचायत समिती, तसेच जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद, येथे संपर्क साधावा. Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, समाज कल्याण सभापती कैलास पावरा, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024 ची प्रक्रिया ऑनलाईन अर्ज करा
मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र 2024 साठी ऑनलाईन अर्ज करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील नागरिकांची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
- योजनेसाठी जारी केलेल्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.https://www.india.gov.in/spotlight/rashtriya-vayoshri-yojana
- मुख्यपृष्ठावर योजनेसाठी दिलेली मार्गदर्शक तत्त्वे वाचा आणि नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
- आता एक नवीन पृष्ठ उघडेल ज्यामध्ये आपण सर्व तपशील योग्यरित्या प्रविष्ट करा आणि पुढे जाण्यासाठी पर्यायावर क्लिक करा.
- या योजनेचा अर्ज पुढील पृष्ठावर उघडेल ज्यामध्ये सर्व आवश्यक तपशील योग्यरित्या प्रविष्ट करा.
- आता सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.
- शेवटी सबमिट पर्यायावर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री वायोश्री योजना 2024 ऑनलाइन अर्ज सहज पूर्ण करू शकाल.
- माहिती pdf मधे वाचा https://gr.maharashtra.gov.in/pdf
🔗आणखी वाचा:PM Suryaghar Yojana 2024: 7500 हजारात मिळवा मोफत वीज ते पण तब्बल 25 वर्षासाठी वाचा माहिती