Mumbai Gate way of India:समुद्रकिनाऱ्यापासून लांब उभे रहा! मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथील व्हायरल व्हिडिओ
Mumbai Gate way of India Viral Video: पावसाळ्यात समुद्र किनारी नागरिकांनी गर्दी करू नये, असे अपेक्षित असते तरीसुद्धा मुंबईकर ऐकत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया Mumbai gate way of India येथील आहे.
पावसाचा जोर आणि नागरिकांची असंवेदनशीलता
सध्या मुंबई पुणे शहर आणि शहराजवळच्या भागात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई-पुणे शहरात गेल्या काही दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. या दिवसांमध्ये नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई हे समुद्र किनाऱ्यावर वसलेलं शहर आहे, त्यामुळे पावसाळ्यात समुद्र किनारी नागरिकांनी गर्दी करू नये, असे अपेक्षित असते. तरीसुद्धा मुंबईकर ऐकत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
Mumbai gate way of India गेट वे ऑफ इंडिया येथील व्हायरल व्हिडिओ
सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे जो मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया Mumbai gate way of India येथील आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक समुद्रकिनारी उभे आहेत, पण पुढे असं काही होतं की सर्वच घाबरतात. व्हिडिओत तुम्हाला ताज हॉटेल समोर समुद्राच्या किनारी उभे असलेले लोक दिसतात. हे लोक समुद्राच्या लाटा बघताना दिसतात. या व्हिडिओत पावसाचे वातावरण आणि समुद्राच्या लाटा जोरजोराने उसळताना दिसतात. तितक्यात एक मोठी लाट समुद्र किनारी येते आणि काही लोकांच्या अंगावर पडते. यामध्ये काही लोक खाली पडतात, ज्यामध्ये एक महिला तिच्या लहान बाळाला घेऊन उभी असते. ती सुद्धा बाळाला घेऊन खाली पडते. सुदैवाने त्यांना कोणालाही गंभीर दुखापत होत नाही.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
chal_mumbai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कृपया समुद्रकिनाऱ्यापासून लांब उभे रहा.” या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “त्या बाईला नाही माहीत का लहान मुलाला घेऊन उभी होती. सगळे लोक पावसाळ्यातच बाहेर निघतात का?”
आणखी पाहा :Maval Crime News: गर्भवती महिलेचा मृत्यू आणि मुलांना जिवंत नदीत फेकलं
युजर्सची प्रतिक्रिया
एका युजरने लिहिलेय, “हे खूप धोकादायक आहे. मुंबई महानगरपालिकेला विनंती आहे की त्यांनी बॅरीकेट लावावे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “व्हिडिओ पाहून अंगावर काटा आला.” काही युजर्सनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे तर काही युजर्सनी असे समुद्रकिनारी न जाण्याची विनंती केली आहे.
पाहा विडिओ :
View this post on Instagram