व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Muslim child viral video: मुस्लीम जोडप्याचा चिमुकला कान्हा: सोशल मीडियावर व्हायरल झालेला भावूक करणारा व्हिडीओ

By Rohit K

Published on:

Muslim child viral video

Muslim child viral video: मुस्लीम जोडप्याचा चिमुकला कान्हा: सोशल मीडियावर व्हायरल झालेला भावूक करणारा व्हिडीओ

Muslim child viral video: श्रीकृष्ण जन्माष्टमी: मुस्लीम जोडप्याने चिमुकल्याला सजविले ‘श्रीकृष्ण’

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, जिथे अनेक धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, नुकतेच Muslim child viral video व्हायरल झालेला एक व्हिडीओ, ज्यामध्ये एक मुस्लीम जोडपे त्यांच्या लहान मुलाला श्रीकृष्णासारखे सजवून दुचाकीवर नेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण भावूक झाले आहेत आणि या घटनेला “खऱ्या अर्थाने भारत” असे संबोधत आहे

आणखी पाहा : Mumbai girl married to Pakistani businessman: मुंबईतील युवतीने केला पाकिस्तानी कोट्यधीशाशी निकाह; वयाच्या फरकामुळे सोशल मीडियावर चर्चेत

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

जन्माष्टमीचा उत्साह आणि दहीहंडीचा आनंद

२५ आणि २६ ऑगस्ट रोजी देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून जन्माष्टमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी अनेक ठिकाणी दहीहंडीचे सोहळे आयोजित केले जातात, जिथे लहान मुलं राधा-कृष्णाच्या वेशभूषेत सजून शाळांमध्ये सहभागी होतात.

Muslim child viral video व्हिडीओने दिले धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, मुस्लीम जोडपे आपल्या चिमुकल्याला श्रीकृष्णाच्या वेशभूषेत सजवून दुचाकीवर घेऊन जाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेक जण भावूक झाले आहेत. भारतात सर्व धर्माचे लोक एकत्रितपणे सण साजरे करतात, आणि या व्हिडीओने याचीच साक्ष दिली आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया: “भारतीय प्रेम आणि संस्कृतीचे प्रतीक”

व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर, युजर्सनी यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने लिहिले, “सर्व धर्मांचा आदर करा.” तर दुसऱ्याने लिहिले, “देवा, या मुलाला आणि त्याच्या पालकांना आशीर्वाद द्या. यालाच भारतीय प्रेम आणि संस्कृती म्हणतात.” या व्हिडीओवर हार्ट इमोजींसह कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ भारताच्या धर्मनिरपेक्षतेचे सुंदर प्रतीक असून, या घटनेने अनेकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे.

पाहा हा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Punjab Locals (@punjablocals)

Muslim child viral video
Muslim child viral video

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews