व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

NariShakti Doot App वर ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

By Rohit K

Published on:

NariShakti Doot App वर ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या योजनेद्वारे सरकार पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देणार आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं करता येतात. ऑनलाईन अर्ज राज्य सरकारच्या ‘नारीशक्ती दूत’ या मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्रावर जाऊन करता येऊ शकतात. ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे कठीण आहे त्या महिला अंगणवाडी केंद्रात जाऊन आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीनं दाखल करू शकतात. अंगणवाडी सेविका तो अर्ज ऑनलाईन ॲपद्वारे अपलोड करतील. या सेविकांना प्रोत्साहन भत्तादाखल प्रति पात्र लाभार्थी 50 रुपये देण्यात येणार आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या योजनेसाठी अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया मोफत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

 

Post Office Scheme: पोस्टाच्या या स्कीम मध्ये 1 हजार रुपये प्रति महिना भरून कसे मिळवू शकणार 8 लाख जाणून घ्या !

ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. Narishakti Doot ॲप डाउनलोड करा:
    • सगळ्यात आधी गुगल प्ले-स्टोअर वरुन ‘Narishakti Doot’ ॲप डाऊनलोड करा आणि ते इंस्टॉल करा.

      NariShakti Doot App
      NariShakti App Play Store Download
  2. लॉग-इन करा:
    • ॲप उघडल्यानंतर मोबाईल नंबर टाका आणि terms and conditions accept करा.
    • लॉग-इन पर्यायावर क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल. तो टाकून Verify OTP वर क्लिक करा.

NariShakti Doot App

  1. प्रोफाईल पूर्ण करा:
    • अर्जदार महिलेचं पूर्ण नाव, ई-मेल आयडी, जिल्हा, तालुका आणि नारी शक्तीचा प्रकार निवडा (उदा. सामान्य महिला, बचतगट अध्यक्ष/सचिव/सदस्य, गृहिणी, ग्रामसेवक).
    • मग अपडेट करा पर्यायावर क्लिक करा.

      NariShakti Doot App
      NariShakti Doot App
  2. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर क्लिक करा:
    • नवीन पेज ओपन होईल. इथे ‘नारीशक्ती दूत’ पर्यायावर क्लिक करा.
    • मग ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ वर क्लिक करा.
  3. अर्ज भरा:
    • अर्जदार महिलेचं संपूर्ण नाव, पती किंवा वडिलांचे नाव, जन्म दिनांक, पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक इत्यादी माहिती भरा.
    • शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेता का, याचे उत्तर द्या.
    • लाभार्थ्यांची वैवाहिक स्थिती निवडा (उदा. अविवाहित, विवाहित, विधवा, परित्यक्त्या, निराधार, घटस्फोटित).
  4. बँक खात्याचा तपशील भरा:
    • बँकेचे पूर्ण नाव, खातेधारकाचं नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड भरा.
    • आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का, हे उत्तर द्या.
  5. कागदपत्रं अपलोड करा:
    • आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, आणि अर्जदाराचा फोटो अपलोड करा.
    • Accept हमीपत्र वर क्लिक करून माहिती जतन करा.
  6. फॉर्म सबमिट करा:
    • सर्व माहिती तपासून ‘फॉर्म सबमिट करा’ पर्यायावर क्लिक करा.
    • मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका आणि फॉर्म सबमिट करा.
    • अर्जाची स्थिती पाहण्यासाठी अर्जाचा क्रमांक मिळेल.
      NariShakti Doot App
      NariShakti Doot App

      NariShakti Doot App
      NariShakti Doot App

NariShakti Doot App

अर्ज केल्यानंतर पुढे काय?

अर्ज दाखल केल्यानंतर त्याची छाननी प्रक्रिया पार पडेल. पात्र अर्जदारांची माहिती प्रसिद्ध केली जाईल. राज्य आणि जिल्हास्तरावर समिती स्थापन केली आहे जी योजनेच्या देखरेखीसाठी आणि पात्र लाभार्थ्यांचे नावे निश्चित करण्यासाठी काम करेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात स्पष्ट केले की, “ज्या अर्जदारांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना तत्काळ पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जातील. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, संबंधित महिन्याचे पैसे देखील दिले जातील.”

सूचना

ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया नुकतीच सुरू झाल्यामुळे अर्ज भरताना काही वेळेस अडचण येऊ शकते. माहिती अपलोड होण्यास विलंब लागू शकतो.

सारांश:

महिलांना आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे या लेखातून जाणून घ्या. प्रक्रिया सोपी असून, यामुळे महिलांना दरमहा 1500 रुपये मिळू शकतात. अर्ज भरण्यासाठी सर्व माहिती आणि कागदपत्रं तयार ठेवा आणि या योजनेचा लाभ घ्या.

अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews