Nashik News: नाशिक बंद दरम्यान तणावाची स्थिती, दुकाने बंद करण्यावरून दोन गटांमध्ये संघर्ष!
सकल हिंदू समाजाच्या मोर्चादरम्यान तणाव, पोलिसांची तातडीची कारवाई
Nashik News: दुकानं बंद करण्यावरून तणाव, दोन गटांत वाद
नाशिक बंद दरम्यान, काही दुकानदारांनी दुकानं बंद करण्यास नकार दिल्यामुळे दोन गटांत वाद झाला. या वादात काही आंदोलकांनी दुकानांची तोडफोड केल्याचे वृत्त आहे. परिणामी, तणाव वाढल्यामुळे नाशिक पोलिस आणि दंगल नियंत्रण पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जमावावर नियंत्रण मिळवले.
Nashik News: पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली
सकल हिंदू समाजाच्या या मोर्चाला काही काळासाठी हिंसक वळण लागले होते. परंतु, पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे मोठा अनुचित प्रकार टाळला गेला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नाशिककरांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या नाशिक शहरात शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्थाही ठेवली आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण असले तरी जनजीवन पुन्हा सामान्य झाले आहे.
📌 आणखी पाहा: Bigg Boss Marathi: सुरज चव्हाणला लव्ह स्टोरीत भेटला गोलिगत धोका, पाहा व्हिडिओ..
🔗पाहा तनावादर्म्यांचा व्हिडिओ:
View this post on Instagram