व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Neeraj Chopra Olympic update: नीरज चोप्राच्या भालाफेकीतील सुवर्ण प्रयत्न: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताचा गोल्डन बॉय याने मिळवले सिल्वर मेडल

By Rohit K

Published on:

Neeraj Chopra Olympic update

Neeraj Chopra Olympic update: नीरज चोप्राच्या भालाफेकीतील सुवर्ण प्रयत्न: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताचा गोल्डन बॉय याने मिळवले सिल्वर मेडल

Neeraj Chopra: नीरज चोप्रा: पॅरिस ऑलिम्पिक २०२४

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या भालाफेक पात्रता फेरीत नीरज चोप्राने Neeraj Chopra पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत स्थान मिळवले. नीरजचा हा थ्रो ८९.३४ मीटरवर गेला, जो या मोसमातील त्याचा सर्वोत्तम थ्रो आहे.

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताचा भालाफेकपटू Neeraj Chopra 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा Neeraj Chopra याने पात्रता फेरीत चमकदार कामगिरी करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याचा पहिला थ्रो ८९.३४ मीटर अंतरावर फेकला गेला. ही त्याचा या मोसमातील सर्वोत्तम थ्रो आहे. अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी, खेळाडूंना ८४ मीटरचा टप्पा पार करायचा होता. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर थ्रो करून सुवर्णपदक पटकावले होते.

पाहा आणखी :Waterfall viral video:‘आयुष्य म्हणजे खेळ नव्हे!’: चिमुकलीच्या डोळ्यांसमोर धबधब्यामध्ये वाहून गेली आई, Viral Video पाहून उडेल थरकाप

नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra)भालाफेकीतील कामगिरी

पात्रता फेरीत नीरजने पहिल्याच थ्रोमध्ये ८९.३४ मीटरचा थ्रो करून सर्व भारतीयांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उमटवली. भारताचा गोल्डन बॉय आता अंतिम फेरीत सुवर्णपदकावर पुन्हा एकदा नजर ठेवणार आहे. नीरजचा हा थ्रो त्याच्या मोसमातील सर्वोत्तम ठरला. याशिवाय तो त्याच्या वैयक्तिक सर्वोत्तम थ्रोच्याही जवळ आला. आता नीरज चोप्रा अंतिम फेरीत ९० मीटरचा अडथळा पार करण्याचा प्रयत्न करेल आणि भारताला सुवर्णपदक मिळवून देईल, अशी अपेक्षा आहे.

नीरज चे प्रतिस्पर्धी

नीरजशिवाय, पाकिस्तानच्या अर्शद नदीमनेही पहिल्याच थ्रोमध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. त्याने ८६.५९ मीटर फेक केली, जी त्याची हंगामातील सर्वोत्तम थ्रो होती. आता अंतिम फेरीत त्याचा सामना भारताच्या नीरजशी होणार आहे. दुसरीकडे, नीरज चोप्राचा सहकारी किशोर जेना ग्रुप-ए मध्ये होता. त्याने ८०.७३ मीटर थ्रो केला आणि तो त्याच्या गटात ९व्या स्थानावर राहिला. तो अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. नीरज चोप्रा पहिल्या फेरीत अव्वल ठरला.

अंतिम फेरीतील आव्हाने

नीरज चोप्रासाठी Neeraj Chopraअंतिम फेरीत सुवर्णपदकाचा बचाव करणे अजिबात सोपे असणार नाही. अंतिम फेरीत त्याचा सामना अ गटातून पात्र ठरलेल्या ज्युलियन बेव्हरसारख्या बलाढ्य खेळाडूशी होईल. त्याने पात्रता फेरीत ८७.७६ मीटर थ्रो केला. अ गटात, ज्युलियन बेव्हर व्यतिरिक्त, ज्युलियस येगोने ८५.९७ मीटर थ्रो केला आणि दुसरे स्थान मिळवून पात्र ठरला. ८५.६३ मीटर अंतरावर भाला फेकणारा वाल्देझ जेकब तिसरा होता. याशिवाय टोनी केराननने ८५.२७ मीटर थ्रो करून अंतिम फेरीत प्रवेश केला.Neeraj Chopra Olympic update

 

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews