UPI Payment Update पेमेंट सिस्टिममध्ये 2 मोठे बदल: कोट्यावधी UPI यूजर्ससाठी अपडेट!
UPI Payment Update भारतामध्ये UPI पेमेंट्सचा वापर प्रचंड वाढला आहे. दररोज लाखो लोक UPI चा वापर करून व्यवहार करतात, आणि हा व्यवहार सुरक्षित असल्यामुळे युजर्सची संख्या सातत्याने वाढत आहे. UPI व्यवहारांवर देखरेख करणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने आता कोट्यावधी युजर्ससाठी एक मोठे अपडेट आणले आहे.
NPCI कडून UPI पेमेंट्समध्ये बदल केले UPI Payment Update
UPI च्या माध्यमातून एखाद्याला पैसे पाठवताना तुम्हाला पासवर्ड टाकावा लागतो. मात्र, आता NPCI ने पासवर्ड सिस्टिममध्ये दोन महत्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तुम्हाला पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही. या नव्या बदलांनुसार, UPI व्यवहारांसाठी फेस आयडी आणि फिंगरप्रिंट हे पर्याय उपलब्ध होतील, ज्यामुळे UPI व्यवहार अधिक सुरक्षित होतील.UPI Payment Update
🔗पाहा ही बातमी: Viral Teacher Video 1उपस्थितीच्या बदल्यात Kiss दे; उन्नाव जिल्ह्यातील शाळेत मुख्याध्यापकाचा व शिक्षिकेचा धक्कादायक प्रकार ; व्हिडिओ व्हायरल
NPCI चा नवा पाऊल UPI Payment Update
NPCI ने अलीकडेच जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार, UPI पेमेंट्ससाठी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन पद्धत लागू करण्यासाठी काही कंपन्यांसोबत चर्चा सुरू केली आहे. डिजिटल व्यवहार करताना अॅडिशनल फॅक्टर ऑथेंटिकेशन (AFA) पर्याय शोधण्यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने दिलेल्या निर्देशांनंतर हे पाऊल उचलले गेले आहे.
UPI व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी NPCI ची योजना
UPI व्यवहार करताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी पारंपारिक पिन आणि पासवर्ड पद्धतीवर विचार करायला हवा, असा सल्ला RBI ने दिला होता. याच मार्गदर्शनाखाली NPCI सध्या स्टार्टअप्ससोबत आर्थिक आणि कायदेशीर बाबींवर चर्चा करत आहे. प्रारंभी, पिन बेस आणि बायोमेट्रिक अशा दोन्ही पद्धती उपलब्ध करुन दिल्या जातील, आणि नंतर आणखी पर्यायांचा समावेश होईल. UPI Payment Update
बायोमेट्रिक्सचा वापर कधीपासून?
तुमच्या स्मार्टफोनमध्ये बायोमेट्रिक सुविधांचा वापर करून UPI व्यवहार करण्यासाठी प्रथम तुमची UPI पेमेंट सिस्टीम व्हेरिफाय करणे आवश्यक असेल. अँड्रॉइड डिव्हाइसेसवर फिंगरप्रिंट सेंसर किंवा आयफोनवर फेस आयडीच्या माध्यमातून तुम्ही हे करू शकता.
सध्या Google Pay, PhonePe, Amazon Pay, आणि Paytm सारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्म्सनी या नव्या सुविधांसाठी पुढाकार घेतला आहे. तांत्रिक बाबींचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर युजर्सना पिन किंवा बायोमेट्रिक्स पर्याय निवडण्याची संधी मिळेल. UPI Payment Update
NPCI या संदर्भात अद्याप कंपन्यांसोबत चर्चा करत आहे, त्यामुळे अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे.