Old Man Dance: पुणेरी आजोबांचा तुफान डान्स! व्हायरल व्हिडिओ एकदा बघाच!
Old Mans Dance: पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत एका आजोबांनी दिलेला जबरदस्त परफॉर्मन्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. गणेशोत्सव पुणेकरांसाठी आनंदाचा आणि उत्सवाचा क्षण असतो, आणि विसर्जन मिरवणूक तर खासच. यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत अनेक हटके व्हिडिओ व्हायरल होत आहेत, त्यातील हा एक आजोबांचा व्हिडिओ लोकांमध्ये खास चर्चेचा विषय ठरला आहे.
आजोबांचा जोश पाहून नेटकरी थक्क!
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एकत्र नाचणाऱ्या तरुणांच्या गर्दीत आजोबांनीही आपली जागा घेतली. विसर्जन मिरवणुकीत सामील झालेले हे आजोबा Old Man Dance वयोमानानुसार काठीचा आधार घेऊन चालत होते, मात्र ढोल-ताशाच्या आवाजात ते थेट स्टेजवर चढले आणि हातातील काठी हवेत फिरवत त्यांनी दिलेला डान्स सगळ्यांना चकित करून गेला! त्यांच्या उत्साहाने नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे.
इंस्टाग्रामवर धमाका!
हा व्हिडिओ @maharashtra_sound_ आणि @punerisoundsofficial या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. “नाद” या कॅप्शनसह व्हिडिओ शेअर करण्यात आला असून, त्यावर ‘पुणेरी पॅटर्न’ असेही लिहिलेले आहे. आजोबांचा नाच बघून अनेकांनी त्यांची तारीफ केली आहे, आणि त्यांची एनर्जी लोकांना भारावून सोडणारी आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिलं, “रुबाब हा जगण्यात असावा, वागण्यात नाही,” ज्यामुळे आजोबांचा रुबाब आणि जोश चर्चेत आला आहे.
पाहा हा व्हिडिओ :
View this post on Instagram