व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

कांदा बाजार : अफगाणिस्तान, नाफेड कांद्यामुळे दरात घट; वाचा मंचरला काय मिळतोय दर || Onion Market

By Rohit K

Published on:

Onion Market

Onion Market, कांदा बाजार : अफगाणिस्तान, नाफेड कांद्यामुळे दरात घट; वाचा मंचरला काय मिळतोय दर

मंचर : अफगाणिस्तानमधून कांद्याची आवक आणि नाफेडचा कांदा (Nafed Onion) विक्रीसाठी बाजारात आल्याने कांद्याचे बाजारभाव (Onion Market Rate) कमी झाले आहेत. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी चांगल्या प्रतीचा दहा किलो कांदा ४५० रुपये भावाने विकला गेला आहे. या अगोदर हाच भाव ५०० रुपयांच्या पुढे होता.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर

गुरुवारी, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत १० हजार ५०० पिशवी कांद्याची आवक झाली. नाफेडचा कांदा बाजारात विक्रीसाठी आल्यामुळे आणि कर्नाटक राज्यात नवीन कांद्याचे बाजारभाव जुन्या कांद्यापेक्षा कमी असल्यामुळे, तो कांदा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि दिल्ली या राज्यांतील बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाला. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव कमी झाले आहेत, अशी माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.

कांद्याचे दर पुढील प्रमाणे :

  • सुपर लॉट १ नंबर गोळा कांदा: ४३० ते ४५० रुपये
  • सुपर गोळे कांदा १ नंबर: ४०० ते ४२० रुपये
  • सुपर मीडियम २ नंबर कांदा: ३८० ते ४२० रुपये
  • गोल्टी कांदा: ३०० ते ३८० रुपये
  • बदला कांदा: १५० ते २४० रुपये

कांद्याची आयात होत असल्याने त्याचे बाजारभाव अजून कमी होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.

राज्यातील कांदा आवक व दर (दि. २६ सप्टेंबर २०२४)

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
कोल्हापूर क्विंटल 2550 1500 4900 3200
अकोला क्विंटल 137 3000 4500 3500
मुंबई – कांदा बटाटा मार्केट क्विंटल 15180 4000 4800 4400
सोलापूर लाल क्विंटल 5761 700 5260 4000
नाशिक पोळ नग 60 3300 4200 3850
लासलगाव उन्हाळी क्विंटल 6954 3500 4867 4600
सटाणा उन्हाळी क्विंटल 7980 1000 4950 4440
रामटेक उन्हाळी क्विंटल 20 4500 5500 5000
देवळा उन्हाळी क्विंटल 6080 1600 4700 4550
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews