Paris Olympic 2024: कुस्तीपटू अंतिम पांघालवर गंभीर कारवाई; ऑलिम्पिक स्पर्धेतून भारतात रवानगी
Paris Olympic Update: ऑलिम्पिक व्हिलेजमधील नियमभंगाचा परिणाम; अंतिम पांघाल अपात्र
Paris Olympic 2024 स्पर्धेत भारताची कुस्तीपटू अंतिम पांघाल हिच्यावर गंभीर कारवाई झाली असून, तिला पुढील सामन्यांसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे. Paris Olympic व्यवस्थापनाने ठरवलेल्या नियमांचा भंग केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे आधीच पदकांच्या शर्यतीत संघर्ष करणाऱ्या भारताच्या आशांवर आणखी धक्का बसला आहे.
पॅरिस पोलिसांनी अंतिम पांघालच्या बहिणीला घेतलं ताब्यात
Paris Olympic व्हिलेजमध्ये खेळाडू आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफसाठी कडक नियम लागू केलेले आहेत. अंतिम पांघालने स्वत:चा पास वापरून तिची धाकटी बहीण निशाला व्हिलेजमध्ये सामान आणण्यासाठी पाठवलं होतं. परंतु, निशाकडे फक्त अंतिम पांघालचा पास असल्यामुळे पॅरिस पोलिसांनी तिच्या हालचालींवर संशय घेतला आणि तिला ताब्यात घेतलं. चौकशीनंतर निशाला सोडलं, परंतु या घटनेमुळे अंतिम पांघालने केलेल्या नियमभंगाचा परिणाम तिला भोगावा लागला.
अंतिम पांघालचा ऑलिम्पिकचा प्रवास थांबला; भारतात रवानगी
पॅरिस ऑलिम्पिक व्यवस्थापनाने हा नियमभंग गंभीर मानला आणि अंतिम पांघालला स्पर्धेतून अपात्र ठरवत, तिला तिच्या सपोर्ट स्टाफसह भारतात परत पाठवलं. अंतिम पांघालसाठी ही ऑलिम्पिकची पहिलीच स्पर्धा होती, जिथे ती ५३ किलो वजनी गटात खेळत होती. तिचा पहिला सामना तुर्कियेच्या येतगिल झेनेपविरुद्ध होता, ज्यात तिला ०-१० असा पराभव पत्करावा लागला होता. तरीही कांस्य पदकाच्या शर्यतीत तिची संधी होती, परंतु तिच्या विरोधकाने उपांत्यपूर्व फेरीत पराभव केल्यामुळे तिच्या ऑलिम्पिक स्वप्नांचा शेवट झाला.
Paris Olympic 2024 मधील या घटनेमुळे भारतीय खेळाडूंवरील ताण आणखी वाढला असून, उरलेल्या काही दिवसांत पदक मिळवण्यासाठी त्यांच्यावर मोठ्या अपेक्षा आहेत.