व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

रामदेव बाबांच्या अडचणी वाढल्या! ‘पतंजली’च्या Veg ‘दिव्य दंतमंजन’मध्ये माशांचे घटक असल्याचा आरोप; दिल्ली हायकोर्टाचा नोटीस Ramdev baba patanjali

By Rohit K

Published on:

Ramdev baba patanjali

Ramdev baba patanjali: रामदेव बाबांच्या अडचणी वाढल्या! ‘पतंजली’च्या Veg ‘दिव्य दंतमंजन’मध्ये माशांचे घटक असल्याचा आरोप; दिल्ली हायकोर्टाचा नोटीस 

Court Notice To Ramdev Baba Patanjali :  योगगुरु बाबा रामदेव यांना हायकोर्टच्या नोटिस 

योगगुरु बाबा रामदेव Ramdev baba patanjali आणि त्यांची कंपनी पतंजली यांच्यावर अडचणी वाढल्या आहेत. एका याचिकाकर्त्याने पतंजलीच्या ‘दिव्य दंतमंजन’ या हर्बल टूथपेस्टमध्ये मांसाहारी घटक असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने बाबा रामदेव आणि पतंजलीच्या दिव्य फार्मसीला नोटीस बजावली आहे. याचिकाकर्त्याने आपण ब्राह्मण असल्याचे नमूद करत, आपल्या धार्मिक भावनांवर या घटनेमुळे आघात झाल्याचे सांगितले आहे.

आणखी पाहा : महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना समस्यांचा सामना,परिस्थिती सध्या अत्यंत चिंताजनक || Onion Market Issue

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

आक्षेप:

वकील यतीन शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये, Ramdev baba patanjali पतंजलीच्या ‘दिव्य दंतमंजन’ हर्बल टूथपेस्टच्या पॅकेजिंगवर हिरवा सर्कल दाखवला जातो, ज्याचा अर्थ प्रोडक्ट पूर्णपणे शाकाहारी आहे असा होतो. मात्र, या टूथपेस्टमध्ये सेपिया ऑफिशिनालिस (कटलफिश) नावाच्या माशाचा घटक असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. यामुळे याचिकाकर्ता आणि त्याचे कुटुंब, जे मागील अनेक वर्षे ही टूथपेस्ट वापरत होते, मोठ्या धक्क्यात आहेत.

नोटीस:

या याचिकेनंतर दिल्ली हायकोर्टाने बाबा रामदेव आणि पतंजलीलाp Ramdev baba patanjali उत्तर देण्याची नोटीस बजावली आहे. याचिकाकर्त्याने आपल्या अर्जात नमूद केले आहे की, कटलफिशचे घटक या माशाच्या हाडांपासून तयार केले जातात, जे मांसाहारी असतात. त्यामुळे यावर न्यायालयाने लक्ष घालून या प्रकरणाचा निपटारा करावा, अशी मागणी केली आहे.

व्हिडिओचा संदर्भ:

याच याचिकेत, बाबा रामदेव यांनी युट्यूबवरील एका व्हिडिओमध्ये ‘समुद्र फेन’ नावाचा प्राणीघटक या टूथपेस्टमध्ये असल्याचे कबूल केले आहे. हे घटक प्राण्यांमधूनच मिळवले जातात, त्यामुळे या प्रोडक्टला शाकाहारी म्हणणे हे चुकीचे आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. यामुळे पतंजलीच्या या उत्पादनावर शाकाहारीचा हिरवा सर्कल का दाखवण्यात आला आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

पुढील सुनावणी:

या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 नोव्हेंबर रोजी होणार असून, कोर्टाने बाब रामदेव आणि पतंजलीला नोटीसवर उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

Ramdev baba patanjali
Ramdev baba patanjali

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews