व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

लो ब्लड प्रेशरवर नियंत्रणासाठी सैंधव मिठाचा ‘असा’ करा वापर! Rock-salt Uses

By Rohit K

Published on:

Rock-salt Uses

Rock-salt Uses: लो ब्लड प्रेशरवर नियंत्रणासाठी सैंधव मिठाचा ‘असा’ करा वापर!

सैंधव मिठाचे फायदे Rock-Salt uses: मिठाचे सेवन जास्त प्रमाणात केल्याने रक्तदाब (ब्लड प्रेशर) वाढू शकतो, मात्र काही वेळा त्याचा योग्य प्रमाणात वापर आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. आयुर्वेदानुसार सैंधव मिठाचा नियमित वापर केल्यास शरीरातील तीन दोष – वात, कफ आणि पित्त संतुलित राहतात. प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांच्या मते, सैंधव मीठ हृदय आणि डोळ्यांसाठी सुरक्षित आहे आणि याच्या वापराने अनेक आजार टाळता येतात.

आणखी पाहा : रोज एक चमचा मध खाल्ल्याने होईल वजन कमी आणि त्वचेवर येईल तेज; जाणून घ्या फायदे || Benefits Of Honey

सैंधव मिठाचे आरोग्यदायी फायदे:

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

1.लो ब्लड प्रेशरसाठी रामबाण उपाय: सैंधव मीठ रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास साध्या पाण्यात अर्धा चमचा सैंधव मीठ मिसळून घेतल्यास रक्तदाब स्थिर राहतो.

2.पचन सुधारण्यास मदत: सैंधव मीठ पचनक्रिया सुधारण्यात मदत करतं. हे अन्न पचनासाठी आवश्यक असलेल्या एन्झाईम्सला सक्रिय करतं, ज्यामुळे अन्न लवकर आणि योग्य प्रकारे पचतं. यामुळे पोटाच्या समस्याही दूर होतात.

3.हृदय निरोगी ठेवतं: साध्या मिठामध्ये सोडिअमचे प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या जसे की, उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक होण्याचा धोका वाढतो. सैंधव मिठात मात्र हे प्रमाण नियंत्रित असल्याने हृदयावर ताण येत नाही.

4.डोळ्यांसाठी फायदेशीर: सैंधव मीठ हे एकमेव मीठ आहे जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. याचा नियमित आहारात समावेश केल्याने डोळ्यांशी संबंधित संक्रमण आणि आजारांचा धोका कमी होतो.

5.मसल्स मजबूत आणि डोकेदुखी कमी: सैंधव मिठामध्ये असणारे पोटॅशियम, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमसारखे महत्त्वाचे घटक स्नायूंची ताकद वाढवतात आणि डोकेदुखीपासून आराम देतात. हे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यास मदत करतात.

6.उर्जा आणि हायड्रेशन वाढवा: सैंधव मिठाच्या सेवनाने शरीराला अधिक ऊर्जा मिळते. पाण्यासोबत घेतल्यास यातील मिनरल्स लवकर अब्जॉर्ब होतात, ज्यामुळे तुम्ही ताजेतवाने आणि उर्जायुक्त राहता.

7.चांगली झोप मिळते: हिमालयन सॉल्ट स्ट्रेस हार्मोन्स कमी करतं, ज्यामुळे तुम्हाला शांत आणि गाढ झोप येते. यातील मॅग्नेशिअम तणाव कमी करण्यास मदत करतं.

8.वजन कमी करण्यास मदत: सैंधव मीठ शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतं, भूक कमी करतं, आणि वजन कमी करण्यासाठी सहाय्यक ठरतं.

सैंधव मिठाचा नियमित वापर केल्याने तुम्ही निरोगी जीवनशैलीचा आनंद घेऊ शकता.

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews