व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

जेव्हा सासूला आवडती सून भेटते: सासूबाईंच्या धमाकेदार डान्सने वऱ्हाडी मंत्रमुग्ध || Sasu-Sun Dance Viral Video

By Rohit K

Published on:

Sasu-Sun Dance Viral Video

Sasu-Sun Dance Viral Video: जेव्हा सासूला आवडती सून भेटते: सासूबाईंच्या धमाकेदार डान्सने वऱ्हाडी मंत्रमुग्ध

सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नवरा-नवरी नव्हे, तर सासूबाईंच्या डान्सची Sasu-sun Dance Viral Video चर्चा रंगली आहे. होणाऱ्या सुनेच्या स्वागतासाठी सासूबाईंनी असा काही जल्लोष केला की वऱ्हाडी मंडळींनीही तोंडात बोटं घातली. सासू-सून नात्याचा एक वेगळा पैलू दाखवणारा हा व्हिडिओ सध्या नेटिझन्सच्या पसंतीस उतरला आहे.

आणखी पाहा : भरवर्गात माकडाची एन्ट्री, त्यानंतर माकडणे केले असे काही.. पाहून तुम्हीही थक्क व्हाल || Monkey Viral Video

सासू-सुनेच्या नात्यातील गोडवा
सासू-सून या नात्यावर अनेक टीव्ही शोज आणि चित्रपटांमध्ये नेहमीच वादाचे प्रसंग पाहायला मिळतात, पण या व्हिडिओने त्या सगळ्या समजुतींना फाटा दिला आहे. एका नववधूच्या स्वागतासाठी सासूबाईंनी जबरदस्त डान्स करून नातेवाईकांसह वऱ्हाडी मंडळींचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या या डान्समुळे सूनही भारावून गेली आणि तीही डान्समध्ये सहभागी झाली.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

धमाकेदार डान्सची चर्चा
हा व्हिडिओ @rajat_dhawaskar_photography या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये सासूबाई “मराठमोळी थोडीशी साधी भोळी, स्वॅग जिचा भारी..बायको पाहिजे नखरेवाली” या गाण्यावर जोरदार डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या उत्साहाने उपस्थित सगळेच थक्क झाले. डान्समध्ये त्यांच्यासोबत आणखी एक महिला दिसत असून, दोघीही जबरदस्त स्टेप्स करत आहेत. सासूच्या या धमाल डान्समुळे सुनेलाही मोह आवरला नाही आणि तीही नाचू लागली.

व्हायरल व्हिडिओ आणि नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सासूच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. “जेव्हा सासुला आपली आवडती सून भेटते तेव्हा” या कॅप्शनसह पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. काही जणांनी या व्हिडिओतून सासू-सुनेच्या गोड नात्याचं कौतुक केलं आहे, तर काहींनी सासूबाईंच्या उत्साही स्वभावावर कमेंट्स केल्या आहेत. “अशी सासू प्रत्येकाला मिळावी” असंही काही नेटकरी म्हणत आहेत.

सुनेच्या स्वागताचं हटके पद्धतीने सेलिब्रेशन
लग्नसमारंभ म्हटला की वधू-वरांच्या तयारीची चर्चा असते, परंतु या व्हिडिओमुळे सासूबाईंच्या डान्सने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अशा हटके आणि उत्साही पद्धतीने सुनेचं स्वागत करणं हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलं आहे.

पाहा हा व्हिडिओ: 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews