वा रे पठ्या! आंबा विक्रीतून रायचूरच्या शेतकऱ्याची लाखोंची कमाई ,नोकरी सोडून शेतीचा मार्ग
Shetkari Yashogatha: आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या मार्गांचा वापर करून भरघोस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पारंपारिक पिकांना बगल देत, इतर पिकांच्या माध्यमातून चांगले उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा आता सगळ्यांना प्रेरणा देत आहेत. कर्नाटकमधील रायचूर येथील गुढीपाडू अंजनेया या शेतकऱ्याने अशाच एका यशस्वी प्रवासाची कहाणी लिहिली आहे.
Shetkari Yashogatha: डिप्लोमापासून शेतीपर्यंतचा प्रवास
गुढीपाडू अंजनेयाने डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बंगळुरु येथे एका खासगी कंपनीत सात वर्षे काम केले. नोकरीत चांगली कमाई करूनही त्याला शेतीत काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. शेतीतील आवड आणि मेहनतीच्या जोरावर त्याने फळबाग, भाज्या, फुले आणि शोभेच्या वनस्पतींच्या कलेत स्वतःला गुंतवले.
शेतकरी यशोगाथा: दोन महिन्यात १८०० किलो आंब्यांची ऑनलाईन विक्री
अंजनेयाने अवघ्या दोनच महिन्यात १८०० किलो आंब्यांची ऑनलाईन विक्री केली आहे. त्याच्या विक्रीत बंगनपल्ली आणि केसरी या आंब्यांचा समावेश आहे. ग्राहकांना थेट शेतातून ताजे आंबे मिळाल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन विक्रीमुळे बाजारात जाण्याचा खर्च वाचल्याने नफा अधिक झाला आहे.
Shetkari Yashogatha: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची दिशा
अंजनेया केवळ कर्नाटकमध्येच मर्यादित न राहता, आपल्या व्यवसायाचा विस्तार इतर राज्यांमध्येही केला आहे. बंगळुरुच्या जयनगरमधील एमईएस ग्राउंड, व्हाईटफील्ड आणि लालबाग येथे झालेल्या आंबा मेळाव्यांत सहभाग घेतल्याने त्याच्या आंब्यांना मोठी मागणी मिळाली. आता त्याचे उद्दिष्ट परदेशात आंब्याची निर्यात करणे आहे.
शेतकरी यशोगाथा: रायचूरमधील इतर शेतकऱ्यांना प्रेरणा
अंजनेयाच्या यशस्वी प्रवासाने रायचूरमधील इतर शेतकरी देखील प्रेरित झाले आहेत. ऑनलाइन विक्रीतून मिळालेल्या यशामुळे अनेकांनी त्याच मार्गाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे.
Shetkari Yashogatha: शेतीतील आव्हाने आणि यश
अंजनेयाने शेतीतील अनेक आव्हानांवर मात करून यश मिळवले आहे. आंबे विकण्याआधी त्याने मोसमी फळे आणि लिंबांची ऑनलाईन विक्री करून आपला मार्ग तयार केला. त्याच्या मेहनतीने आणि ध्येयाने त्याला शेतीत यश मिळवून दिले आहे.
गुढीपाडू अंजनेयाची ही कहाणी केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर, मेहनत आणि ध्येय ठेवल्यास कोणतेही आव्हान पार करता येते, हे त्याने दाखवून दिले आहे.