व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Solapur Baramati Robbary Case: सोलापूर व बारामतीत घरफोड्या करणाऱ्या संशयिताला अटक; 28.41 लाखांचे सोने-चांदी हस्तगत

By Rohit K

Published on:

Solapur Baramati Robbary Case

सोलापूर व बारामतीत घरफोड्या करणाऱ्या संशयिताला अटक; २८.४१ लाखांचे सोने-चांदी हस्तगत

TATA Nano new Car :- बुलेट बाईकच्या किंमतीत 30 Kmpl मायलेज असलेली टाटाची 2024 मॉडेलची नवीन कार लॉन्च, किंमत आणि वैशिष्ट्ये पहा

Solapur Baramati Robbary Case: सोलापूर शहर आणि बारामती परिसरात घरफोड्या करणाऱ्या एका संशयिताला सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २८ लाख ४१ हजार ४०० रूपयांचे सोने आणि चांदी हस्तगत करण्यात आले आहे. त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेली मोटार आणि अन्य साहित्यही जप्त करण्यात आले आहेत.

Solapur Baramati Robbery: आरोपीची ओळख

राजकुमार पंडित विभूते (वय ४२, रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर) असे या घरफोड्यांच्या गुन्ह्यांतील आरोपीचे नाव आहे. सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीसमोरील चौकात पहाटे संशयास्पदरीत्या फिरताना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यास हटकले. पोलिसांच्या खाक्या दाखविताच त्याने जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या एका घरफोडीची कबुली दिली.

Solapur Baramati Robbery: गुन्ह्यांची कबुली

पोलीस कोठडीत असताना राजकुमार विभूते याने मागील वर्षात आणखी पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली. यात जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन, फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक आणि बारामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्यांचा समावेश आहे.

Solapur Baramati Robbery: हस्तगत मुद्देमाल

Solapur Baramati Robbary Case
सोलापूर बारामती चोरीची केस आपल्या Mh-Live.Com वर
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

या सर्व गुन्ह्यांतून लंपास केलेले १६ लाख ४९ हजार रूपये किंमतीचे ३८.९ तोळे सोन्याचे दागिने, सहा लाख ७३ हजार रूपये किंमतीचे १७.८३० किलो वजनाचे चांदीचे अलंकार व दागिने असा ऐवज हस्तगत करण्यात आला. तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटार आणि घरफोड्या करून लंपास केलेले सोन्याचे दागिने वितळविण्यासाठी वापरात असलेले यंत्र आणि अन्य साहित्यही जप्त करण्यात आले.

Pune Crime News: शातिर आरोपी मोबाईल वापरत नव्हता, बघा कशी पोलिसांनी केली अटक?

Solapur Baramati Robbery: पोलिसांचे कौतुक

पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली. हे घरफोड्यांचे गुन्हे उजेडात आणण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले. या पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करण्यात आले आहे.

Viral Police Video: पोर जोमात आणि पोलीस कोमात,Video पाहून पोट धरून हसाल!

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews