Shocking Viral Video: भयंकर! हातातून मोबाईल हिसकावल्याचा राग, आईच्या डोक्यात बॅट घालणाऱ्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल
मुलांचे मोबाईल व्यसन पालकांसाठी धोकादायक
Shocking Viral Video : मोबाईलच्या अतीव व्यसनामुळे मुलांचे बालपण हरवत चालले आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने पालकांना हादरवून सोडले आहे. या व्हिडिओत एक लहान मुलगा मोबाईल हिसकावल्याने चिडतो आणि आईच्या डोक्यात लाकडी बॅट मारतो. हा धक्कादायक व्हिडिओ सध्या जोरदार चर्चेत आहे.
आणखी पाहा : शिक्षकाचा घाणेरडा चेहरा उघड: ‘Viral MMS’ मुळे कोचिंग सेंटरमध्ये खळबळ!
मोबाईलच्या नशेमुळे लहान मुलांचा धिंगाणा
आजच्या युगात मोबाईल प्रत्येकाच्या हातात दिसतो. मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांचं जीवन मोबाईलशिवाय अपूर्ण वाटू लागलं आहे. मात्र, मोबाईलचा अतिरेकी वापर लहान मुलांवर किती गंभीर परिणाम करतो, याचा प्रत्यय या घटनेतून आला आहे. व्हिडिओमध्ये शाळेच्या गणवेशातील एक लहान मुलगा बेडवर बसून मोबाईलवर गेम खेळताना दिसतो. त्याच्या आईने त्याच्याकडून मोबाईल हिसकावून घेतल्यावर तो मुलगा रागाने बेफाम होतो.
रागाच्या भरात आईच्या डोक्यात बॅट
आई मोबाईल हिसकावून घेतल्यावर मुलगा काही क्षण बेडवर शांत बसून राहतो. परंतु, त्यानंतर त्याचा संताप अनावर होतो आणि तो किचनमध्ये जाऊन लाकडी बॅट घेऊन येतो. तीच बॅट त्याने थेट जेवण करणाऱ्या आईच्या डोक्यात घातली. यामुळे आई जमिनीवर बेशुद्ध होऊन पडते. या घटनेनंतर मुलाने कसलीही खंत न करता तिच्या हातातून मोबाईल घेतला आणि पुन्हा गेम खेळायला सुरुवात केली.
पालकांच्या चिंतेत भर
हा संपूर्ण प्रकार घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओने पालकांची झोप उडवली आहे. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून मुलांच्या मोबाईलच्या व्यसनाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. काही लोकांनी हा व्हिडिओ बनावट किंवा स्क्रिप्टेड असल्याचंही सांगितलं आहे. मात्र, मुलांच्या वाढत्या मोबाईलच्या व्यसनाकडे पालकांनी गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक आहे, असा इशारा तज्ञांनी दिला आहे.
हेही वाचा: मुलांना योग्य तंत्रज्ञान वापर कसा शिकवायचा? पालकांनी घेतली पाहिजे खबरदारी!
पाहा हा व्हिडिओ:
Mobile phones addiction: See how this child took the life of his own mother. pic.twitter.com/FUIl9ExZRg
— Baba Banaras™ (@RealBababanaras) October 2, 2024