व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Son-in-Law Viral Video: सासू असावी तर अशी! जावयाच्या ताटात वाढले 379 पदार्थ; व्हिडिओ झाला तुफान व्हायरल

By Rohit K

Updated on:

Son-in-Law Viral Video: सासू असावी तर अशी! जावयाच्या ताटात वाढले 379 पदार्थ; व्हिडिओ झाला तुफान व्हायरल

Son-in-Law Viral Video:सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका जावयाच्या ताटात तब्बल 379 पदार्थ वाढवले गेले आहेत.

Son-in-Law Viral Video:सासरवाडीत आलेल्या जावयाची आदरातिथ्य करताना सासरची मंडळी काहीही कमी पडू देत नाहीत. मानापान आणि खास मेन्यूसह जावयाला आग्रहाने खायला घालण्याची परंपरा आहे. नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडिओ हेच दाखवतो. Son-in-Law Viral Video या व्हिडिओत सासरवाडीत आलेल्या जावयाच्या ताटात चार-पाच नव्हे तर तब्बल 379 विविध पदार्थांची मेजवानी सजवण्यात आली आहे, ज्यामुळे नेटकर्‍यांचे कौतुकाचा वर्षाव झाला आहे.

आणखी पाहा :Car Accident Viral Reel: “शाझाईब धीरे, शाझाईब धीरे” आणि गाडी थेट गटारात, थरारक व्हिडिओ व्हायरल 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

व्हिडिओत दिसणारे जोडपे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये विवाहबंधनात अडकले होते. हा विवाहानंतरचा जावयाचा पहिलाच सासुरवाडीचा दौरा होता. मकर संक्रांतीच्या निमित्ताने सासरच्या मंडळींनी जावयाला खास निमंत्रण दिलं होतं, ज्यासाठी या भव्य मेजवानीची व्यवस्था करण्यात आली होती. सासरच्या मंडळींनी जावयाच्या ताटात 379 पदार्थ वाढले होते.

या मेजवानीत 40 प्रकारचे भात, 20 प्रकारच्या रोट्या, 40 प्रकारच्या करी, 40 प्रकारचे तळलेले पदार्थ, 70 प्रकारच्या भाज्या, पापड, लोणचं, डाळ अशा पारंपारिक पदार्थांसह 90 ते 100 प्रकारचे गोड पदार्थ, तसेच ताक, दही, चहा, कॉफी आणि विविध प्रकारचे पेय यांचा समावेश होता. व्हिडिओमध्ये, सासरच्या मंडळींनी जावयाला उचलून जेवणाच्या टेबलावर बसवलं आणि प्रत्येक पदार्थ चाखण्याचा आग्रह धरला होता.

सासू असावी तर अशी जावयाला वाढले 380 ॲटम 20240820 103627 0000

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील एका गावाचा आहे. kus_dhar आणि kusuma__rao या इन्स्टाग्राम अकाउंटवरून 16 जानेवारी 2023 रोजी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता, जो सध्या तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून, 172,534 पेक्षा अधिक लाईक्स आणि हजारो कमेंट्स मिळाल्या आहेत.

पाहा हा विडिओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by kusdhar (@kus_dhar)

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews