व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Success Story Of 10th Pass: १५०० रुपयांवर नोकरी, आता ३६ कोटींचा मालक

By Rohit K

Published on:

Success Story Of 10th pass

Success Story Of 10th Pass: १५०० रुपयांवर नोकरी, आता ३६ कोटींचा मालक

Success Story Of 10th Pass: स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिस्थिती, वय कधीच महत्त्वाचे नसते. केवळ आत्मविश्वास आणि जिद्द महत्त्वाची असते. अशाच एका यशस्वी व्यावसायिकाची प्रेरणादायी यशोगाथा आज आम्ही सांगणार आहोत. हा व्यावसायिक आहे अशफाक चुनावाला, ज्याने फक्त १० वीपर्यंत शिक्षण घेतले आणि आता तो ३६ कोटींचा मालक आहे.

Success Story Of 10th Pass: सुरुवातीचे खडतर आयुष्य

अशफाक चुनावालाने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दहावीनंतर शिक्षण सोडले. २००४ मध्ये त्याने १५०० रुपये मासिक पगारावर रिटेल स्टोअरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. अधिक चांगला पगार मिळावा यासाठी त्याने अनेक वर्षे विविध नोकऱ्या केल्या. अनेक ठिकाणी गुंतवणूक केली, पण त्यातूनही पैसे गमावले.

Success Story Of 10th Pass: नशीब बदलण्याची संधी

२०१३ मध्ये अशफाकने नवीन लॉंच केलेल्या राइड-हेलिंग ॲपची जाहिरात पाहिली आणि तिथेच त्याचे नशीब बदलले. त्याने पार्ट टाइम चालक म्हणून काम सुरू केले. दिवसाचा एक भाग कॅब चालवण्यात आणि संध्याकाळी स्किनकेअर स्टोअरमध्ये काम करण्यात घालवला. त्याच्या मेहनतीमुळे त्याला दरमहा ५०,००० रुपये मिळू लागले.

Success Story Of 10th Pass: व्यवसायाची सुरुवात

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Success Story Of 10th pass

अशफाकने कमाईचे पैसे साठवून स्वतःची एक गाडी लोनवर घेतली. त्यानंतर त्याच्या बहिणीने दुसरी कार घेण्यासाठी मदत केली. अशफाकने बँकेकडून १० लाख रुपयांचे कर्ज घेऊन तीन गाड्या घेतल्या. त्यानंतर त्याच्या व्यवसायाने झपाट्याने प्रगती केली. आज त्याच्याकडे ४०० गाड्या असून, व्यवसायाची वार्षिक उलाढाल ३६ कोटी रुपये आहे.

Shetkari Success Story: तरुणाचा दूध प्रक्रिया उद्योग: शेतकरी पुत्र ते उद्योजक

Success Story Of 10th Pass: पुढील लक्ष्य

अशफाकच्या या यशोगाथेतून स्पष्ट होते की, परिस्थिती कितीही खडतर असली तरी आत्मविश्वास आणि मेहनत यामुळे यश नक्कीच मिळते. अशफाक लवकरच आणखी १०० गाड्या घेण्याच्या तयारीत आहे. त्याच्या या यशाने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे.

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews