रात्री लवकर झोप येत नाही? या १० मिनिटांच्या सोप्या उपायाने मिळवा शांत झोप
झोपेच्या समस्यांवर उपाय: Tips for Quick Sleep
चांगल्या आरोग्यासाठी सात ते आठ तासांची शांत झोप आवश्यक असते. मात्र, ताणतणाव, फोनचं व्यसन, आणि बदलती जीवनशैली यामुळे चांगली झोप मिळणं कठीण होतं. मोबाईल, टीव्ही, सोशल मीडिया यामुळे आपण रात्री उशिरापर्यंत जागं राहतो, परिणामी झोप उशिरा लागते आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
तुम्हाला झोप न लागण्याची समस्या असेल तर, मीरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलच्या ऑटोरहिनोलॅरिन्गोलॉजी आणि डोके व मान ऑन्कोसर्जरीच्या सल्लागार डॉ. शीतल राडिया यांच्यानुसार, झोपेच्या आधी काही सोप्या व्यायामांनी स्नायूंना आराम मिळतो, शरीर लवचिक होतं आणि शांत झोप लागते.
आर्म स्विंग्स व्यायामाचा चमत्कारीक परिणाम
Tips for Quick Sleep: मसाज थेरपिस्ट जेम्स मूर यांच्या मते, “आर्म स्विंग्स” हा व्यायाम झोपण्यापूर्वी फक्त १० मिनिटे केल्यास अंथरुणावर पडताच चांगली झोप लागते. हा व्यायाम शरीराला रिलॅक्स करतो, रक्तदाब कमी करतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारतो.
हा व्यायाम करण्यासाठी सरळ उभं राहा, शरीर शिथिल करा, आणि हात उजव्या बाजूपासून डाव्या बाजूला हलवा. मूर सांगतात की, या लयबद्ध हालचाली मज्जासंस्थेला “उत्तेजित” करतात, ज्यामुळे तुम्हाला शांत झोप मिळते.
गुरुग्रामच्या नारायण हॉस्पिटलमधील पल्मोनोलॉजी आणि स्लीप मेडिसिन वरिष्ठ सल्लागार, डॉ. श्वेता बन्सल यांच्या मते, आर्म स्विंग्सच्या लयबद्ध हालचाली रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी, आणि शरीराला विश्रांतीसाठी उत्तम आहेत.
डॉ. शीतल राडिया यांचं म्हणणं आहे की, व्यायामासोबतच आहारही योग्य असायला हवा. मानसिक तणाव, वारंवार कोल्डड्रिंकचं सेवन, या कारणांमुळे झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.