Today Rashi Bhavishya in marathi – सुप्रभात. स्वागत आहे तुमचं, आजच्या राशीभविष्य मध्ये, तर मग चला सुरुवात करूया आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की, आज तुमच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे.
Today Rashi Bhavishya in marathi
मेष रास – श्री गणेश सांगतात की, मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा लाभाच्या नवीन संधी घेऊन येईल. तुम्हाला तुमचं उत्पन्न आणि खर्चामध्ये ताळमेळ राखावा लागेल. नाहीतर समस्या या उद्भवू शकतात. अजिबात नकारात्मक विचार तुम्ही आज करू नका. नाहीतर तुम्ही चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कार्यालयातील काही मुद्द्यांवरती वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचा वाद होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही थोडे चिंतेमध्ये असाल तुमच्या वडिलांनी तुमच्यावर काही जबाबदारी दिली असेल, तर ती तुम्ही वेळेमध्ये पूर्ण करायला हवी. आज तुम्ही धार्मिक यात्रेला जाण्याचा बेत करू शकतात. तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी एखादी नवीन मशनरी खरेदी करू शकता. नशीब आज तुमच्या बाजूने 85% राहील. तुम्ही आज गरजवंताला भाताचे दान करा.
वृषभ रास – श्री गणेश सांगतात की, वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी ठरणार आहे. तुमच्या आजूबाजूचे वातावरण प्रसन्न राहील. आणि तुम्हाला एका मागून एक चांगल्या बातम्या मिळतील. प्रदेशातून आयात निर्यात व्यवसाय करणाऱ्यांना मोठी ऑर्डर मिळू शकते. परंतु काम करणाऱ्यांना आज सावध राहावं लागेल. आवश्यकतेपेक्षा जास्त गुंतवणूक केल्याने तुम्हाला थोडेफार नुकसान होऊ शकते. कुटुंबामध्ये पार्टीचा आयोजन केल्याने तुम्ही काही खास लोकांना भेटाल ही भेट तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आज नशीब ६१% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग साधना आणि प्राणायामाचा अभ्यास करा.
मिथुन रास – श्री गणेश सांगतात की, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा प्रगतीचा दिवस असणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना नवीन कामांमध्ये रस वाढेल. तुमच्या नोकरीमध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलेली कोणत्याही चुकीची गोष्ट तुम्ही मान्य करू नका. नाहीतर तुम्हाला याचा भविष्यामध्ये पश्चाताप होईल. जर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करणार असाल, तर तुमची इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला काही कौटुंबिक बाबींचा गांभीर्याने विचार करावा लागेल. नाहीतर नात्यांमध्ये तणाव निर्माण होईल. आणि मुलांना नवीन नोकरी लागल्याने तुमचा वातावरण थोडसं आनंदी होऊन जाईल. नशीब आज 90% तुमच्या बाजूने राहील, तुम्ही आज पहिली पोळी गोमातेला खाऊ घाला.
कर्क रास – श्री गणेश जी सांगतात की, कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आनंददायी ठरणार आहे. तुम्हाला नवीन प्रसिद्धी मिळाल्याने तुमचे आई-वडीलही आनंदी होतील. एखाद्या नव्या कामासाठी तुम्ही जाणार असाल, तर आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊनच निघा. तुम्ही एखाद्या प्रकल्पावरती काम सुरू करू शकता. जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित एखाद्या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. काही जुन्या भांडणातून आणि समस्यांपासून तुमची सुटका होईल. खूप दिवसांनी जुनी मित्र किंवा मैत्रिणी तुम्हाला भेटतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील.
सिह रास – श्री गणेश जी सांगतात की, तुम्ही आज देवी लक्ष्मीला जल अर्पण करा. तुम्हालाआजच्या दिवशी कठोर परिश्रम करावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेची तयारी जोमात केली पाहिजे. आणि तरच ते परीक्षेमध्ये यश मिळवू शकतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करताना पाहून लोक तुमची प्रशंसा साकारतील. आज तुम्हाला काहीतरी नवीन करण्याच्या इच्छेमुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यासाठी तुम्हाला एखाद्या कायदेशीर बाबींमध्ये धावपळ करावी लागेल. तरच निर्णय तुमच्या बाजूला होईल. जर तुमचा एखाद्या जुन्या मित्राशी वाद झाला असेल, तर तुम्हाला माफी मागून तो वाद आज संपवावा लागेल. आज नशीब 74% तुमच्या बाजूला राहील. तुम्ही आज वेगळ्या वस्तूंचा दान करा.
कन्या रास – श्री गणेश जी सांगतात की, कन्या रासच्या लोकांच्या वैवाहिक जीवनामध्ये आजचा दिवस ताण तणाव घेऊन येणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या मुद्द्यावरती तुमचं मतभेद होऊ शकतात. परंतु तुम्हाला घाई घाईत निर्णय घेणे टाळावे लागेल. आईची तब्येत अचानक बिघडल्याने तुमची थोडी दगदग होईल, धावपळ होईल जुन्या चुकांमधून तुम्हाला आज धडा घ्यावा लागेल. तुम्ही तुमच्या मिळकतीतही काही भाग हा धार्मिक कार्यामध्ये गुंतवाल ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे विवाहामध्ये काही अडथळे येत असतील,, तर तेही आज दूर होतील तुमच्या मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तुम्ही थोडा वेळ काढा. आज नशीब 75% तुमच्या बाजूला राहील. तुम्ही आज श्वेता वस्तूंचे दान करा.
तुळ रास – श्री गणेश सांगतात की, तूळ राशीचे लोक आजचा दिवस मित्र-मैत्रिणींसोबत आनंदाने व्यतीत करतील. तुमच्या कामांमध्ये निष्काळजीपणा तुम्ही आज करू नका. किंवा दुसऱ्याच्या भरोशावरती काम सोडू नका. नाहीतर तुमचा नुकसान आज तुम्हाला पैशांच्या बाबतीमध्ये सावध राहावं लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांना बडतीमुळे एका ठिकाणाहून दुसरीकडे जावं लागू शकतात. जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल मानसिक दृष्ट्या स्वस्थ असाल, तर तुम्ही आज तुमच्या वडिलांसोबत त्या बाबतीमध्ये चर्चा करून निर्णय घेऊ शकता. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा.
वृश्चिक रास – श्री गणेश जी सांगतात की, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूपच फलदायी ठरणार आहे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा तुमच्यावरती प्रभाव पडेल. ज्यांच्याकडून तुम्हाला फायदाही होऊ शकतो. तुमच्या वैयक्तिक आयुष्य मध्ये तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल. पण यामुळे तुम्ही घाबरणार नाही. आणि त्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. एखाद्या कामासाठी तुम्हाला अचानक धावपळ करावी लागू शकते. तरच ते काम पूर्ण होईल. तुमच्या मुलांच्या शिक्षणाशी संबंधित काही चांगली बातमी तुम्हाला आज मिळू शकते. राजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांची भेट एखाद्या मोठ्या नेत्याशी होईल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचरित्र वाचा.
धनु रास – श्री गणेश जी सांगतात की, धनु राशीच्या मंडळींना आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमची रखडलेली काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबामध्ये सुरू असलेल्या काही वादामुळे आज तुम्ही त्रासलेल्या असाल. त्यासाठी वडीलधाऱ्या मंडळींशी बोलणं तुम्हाला आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या नियंत्रण ठेवावे लागेल. नाहीतर पोटाशी संबंधित काही आजार होऊ शकतात. आज नशीब 97% तुमच्या बाजूला राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा.
मकर रास – श्री गणेश जी सांगतात की, मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा संमिश्र राहील. आज तुम्ही तुमच्या दैनंदिन गरिजेच्या काही वस्तू देखील खरेदी करू शकता. जर तुम्हाला पैशांची संबंधित काही मदत हवी असेल, तर तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना विचारू शकता. तुम्ही एखाद काम आधीपासूनच ठरवलं असेल, तर ते आज पूर्ण होऊ शकतात. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला संयम राखावा लागेल. नाहीतर मागून तुम्हाला त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासामध्ये पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. नाहीतर त्यांना नंतर समस्यांना सामोरे जावे लागेल. तुमच्या मोकळे वेळेचा तुम्ही सदुपयोग करा. आज नशीब 65 टक्के तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यायला विसरू नका.
कुंभ रास – श्री गणेश जी सांगतात की, आजच्या दिवशी अनुकूल परिणाम मिळणार आहेत. नोकरीसाठीच्या टाचा जिजवणाऱ्या लोकांना चांगली नोकरी मिळू शकते. आणि पैसे मिळवण्याचे काही नवीन मार्ग देखील तुमच्यासाठी उघडतील मजबूत होईल. जर तुम्ही आधी कोणाकडून पैसे घेतले असतील, तर ते फिरण्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात यशस्वी व्हाल. कुटुंबातील कोणाशीही वाद घालणं तुम्हाला टाळावे लागेल. नाहीतर कौटुंबिक नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कनिष्ठ सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आज नशीब 63% तुमच्या बाजूला राहील. तुम्ही आज तुळशीला पाणी अर्पण करा आणि तुळशीपाशी दिवा लावा.
मीन रास – श्री गणेश सांगतात की, आजचा दिवस या राशीच्या लोकांसाठी सामान्य असेल. जर तुम्हाला तुमच्या खर्चाची काळजी वाटत असेल, तर त्यासाठी एक अंदाजपत्रक तयार केल्यास ते तुमच्यासाठी चांगला होईल. तुमची मुलं तुमच्याकडून काहीतरी मागण्याची शक्यता आहे. ज्यामुळे आनंद टिकून राहील. तुमच्या कामांमध्ये काही अडथळे आले असतील, तर तेही आज दूर होतील. तुमच्या जोडीदाराशी बोलताना तुम्हाला ताळमेळ राखावा लागेल, नाहीतर काहीतरी समस्या होऊ शकतात. आज नशीब 81% तुमच्या बाजूला राहील. तुम्ही आज शिवचरित्र पठन करा.
पोस्ट ऑफिस ५२० रुपये योजना संपूर्ण माहिती
मित्रांनो अशा पद्धतीने आजचे राशिभविष्य राहणार आहे. आजचे राशिभविष्य मध्ये काही ना काही चांगले नक्कीच घडाव असे प्रभूचरणी प्राथना करतो. धन्यवाद..!