Today Vegetable Rate: भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ: आजचा भाजीपाल्याचा भाव
Today Vegetable Rate: राज्यात मागील महिन्यापासून जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रोजच्या जेवणात लागणारे कांद्या-बटाट्याचे भाव आता ५० रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत, तर पणजी बाजारात टोमॅटो ८० रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत. लालेलाल टोमॅटो अजूनही भाव खात आहेत.
फलोत्पादन महामंडळाच्या गाळ्यांवर मात्र टोमॅटो ५३ रुपये प्रति किलो दराने विकले जात आहेत. कांदे, बटाटे तसेच इतर भाज्यांचे दर मार्केटमधील भाजीच्या तुलनेत कमी आहेत. बेळगाव भागात मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर सुरू असल्याने भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे, ज्यामुळे दर वाढले आहेत.
पावसाळी रानभाज्या, कोंब, आकूर, कुर्डू, टायकिळो, नीरफणस, भाजीची केळी यांना चांगली मागणी आहे. मध्यम आकाराचे नीरफणस १०० रुपयांना एक दराने विकले जात असून बाजारात गावठी तसेच रानभाज्यांना चांगली वाढ मिळाली आहे.
🔗आणखी पाहा:Aajcha Sone Cha Bhav: मुंबईतील सोन्याचा दर 29 जुलै
Today Vegetable Rate: भाज्यांचे दर (आजचा भाजीपाल्याचा भाव)
भाजी | फलोत्पादन बाजारातील दर (₹ प्रति किलो) | मार्केटमधील दर (₹ प्रति किलो) |
---|---|---|
कांदा | ४१ | ५० |
बटाटा | ४० | ५० |
टोमॅटो | ५३ | ८० |
कोबी | २८ | ४० |
भेंडी | ३९ | ८० |
गाजर | ४२ | ८० |
हिरवी मिरची | ५५ | ८० |
आजचा भाजीपाल्याचा भाव पाहून नागरिकांनी योग्य ठिकाणी खरेदी करावी आणि आपल्या खिशाला थोडासा दिलासा द्यावा. या दरांमध्ये होणारे बदल लक्षात घेऊनच खरेदी करावी.
आजच्या भाजीपाल्याच्या भावांवर आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.
🔗व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा आणि ताज्या अपडेट्स मिळवा.