व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

शाळेतील दोन शिक्षिका भरवर्गात भिडल्या, मुलांचं भविष्य धोक्यात? व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण || Teachers Fight Viral Video

By Rohit K

Published on:

Teachers Fight Viral Video

Teachers Fight Viral Video: शाळेतील दोन शिक्षिका भरवर्गात भिडल्या, मुलांचं भविष्य धोक्यात? व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

सोशल मीडियावर नवनवीन व्हिडिओ रोजच व्हायरल होत असतात. पण सध्या एक धक्कादायक व्हिडिओ चर्चेत आहे, ज्यात शाळेतील दोन शिक्षिका भरवर्गात भिडल्या आहेत. विद्यार्थी जिथे शिक्षकांकडून शहाणपण आणि नैतिकतेचे धडे घेतात, तिथेच या दोन शिक्षिकांमध्ये झालेल्या भांडणाने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.

आणखी पाहा : तिने त्याच्याबरोबर रेस्टॉरंटमध्ये केलं ‘असं’ काही की दोघांना पडलं महागात, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा हा व्हिडीओ होतोय व्हायरल || Girlfriend Boyfriend Viral Video

व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत, एका वर्गात विद्यार्थ्यांसमोर दोन महिला शिक्षिका आपसात भांडताना दिसतात. एक शिक्षिका खुर्चीवर बसलेली असताना, दुसरी शिक्षिका तिच्या अंगावर धावून जाते. मग खुर्चीवर बसलेली शिक्षिका तिला प्रतिउत्तर देत मारामारी सुरू करते. हे सगळं मुलांसमोर होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडतो.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

शाळेतील इतर शिक्षक हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. एक शिक्षक दोघींना थांबवण्याचा प्रयत्न करत, “मॅडम, थांबा, असं करू नका,” असे म्हणतो. परंतु, त्या दोघी एकमेकांच्या जीवावर उठल्याचं या व्हिडिओत स्पष्ट दिसतं.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
हा व्हिडिओ @yadav2398paro या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, “मुलांचं भविष्य धोक्यात! शिक्षिका एकमेकांबरोबर भांडतायत,” असे कॅप्शन देण्यात आले आहे. या व्हिडिओला ३.४ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, आणि यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काहींनी यावर उपरोधिक कमेंट्स केल्या आहेत, “ही नक्कीच सरकारी शाळा असणार,” असे एकाने लिहिलं. तर दुसरा म्हणतो, “ज्याने शपथ दिली त्याच्यावरून भांडण होतंय वाटतं.” काही जणांनी हे भांडण मुलांच्या भविष्यासाठी हानिकारक असल्याचे सांगितले.

या घटनेने शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर योग्य वर्तन कसं असावं याचं भान ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.

पाहा हा व्हिडिओ : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Parul Yadav (@yadav2398paro)

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews