Union Budget 2024: कृषी क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटींची तरतूद, शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म – केंद्रीय अर्थसंकल्पात बळीराजाला काय मिळालं?
कृषी Union Budget 2024: मोदी 3.0 सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कृषी क्षेत्रासाठी महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील अर्थसंकल्प
Union Budget 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची सर्वांना मोठी उत्सुकता होती. आज (दि. 23) आर्थिक वर्ष 2024-25 साठीचा देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत.
कृषी क्षेत्रासाठी महत्वाच्या घोषणा
निर्मला सीतारामन यांनी सर्वप्रथम मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून दिल्याबद्दल देशवासीयांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार समाजघटकांवर आपले लक्ष केंद्रीत करायला हवे. या अर्थसंकल्पात 9 प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यात शेती क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, उर्जा संरक्षण, पायाभूत संरचना, संशोधन व विकास, नव्या पीढीतील सुधारणा आदींचा समावेश आहे.
आणखी पाहा :Water scooter :- पाण्यावर धावणारी स्कूटर लॉन्च 1 लिटर पाण्यामध्ये धावणार 150 किलोमीटर स्कूटर
कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याचा कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोठा फायदा होईल. शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढावी यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवले जाणार आहे. यामुळे शेतीपिकांचे सर्वेक्षण, मातीची तपासणी अशा सर्व गोष्टींची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ती पावलं उचचली जाणार आहेत. आगामी वर्षात नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा निर्णय घेतला असून पुढील काही वर्षात एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करण्यास प्रोत्साहन दिले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
प्रमुख घोषणांची झलक
– नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणार
– कृषी उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर
– डाळ आणि तेलबियांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यावर भर
– शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार, सहा कोटी शेतकऱ्यांचा रेकॉर्ड डिजिटल होणार
– शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाईल
– शेतीपिकांचं सर्वेक्षण, मातीची तपासणी याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जाईल
– कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद
– सोयाबीन आणि सुर्यफुल बियांची साठवण वाढवणार
– 32 फळ आणि भाज्यांच्या 109 जाती वितरीत करणार
कृषी क्षेत्राला आधुनिक आणि सक्षम करण्यासाठी या अर्थसंकल्पात विविध योजना आणि तरतुदी करण्यात आल्या आहेत. या सर्व घोषणांच्या अंमलबजावणीमुळे बळीराजाला मोठा लाभ होईल.