व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Vegetable Rate: गृहिणींच्या किचन बजेटला मोठा धक्का: लिंबू ८ रुपयांना, तर इतर भाजीपाला पण महागला

By Rohit K

Published on:

Vegetable Rate: गृहिणींच्या किचन बजेटला मोठा धक्का: लिंबू ८ रुपयांना, तर इतर भाजीपाला पण महागला

Vegetable Rate, मुंबई – महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. गव्हापासून ते डाळींचे भाव गगनाला भिडलेले असताना, आता भाजीपाल्याचे दरसुद्धा आकाशाला भिडले आहेत. एक लिंबू ८ रुपयांना मिळत असून, इतर भाज्यांचे भावसुद्धा कडाडले आहेत.

महागाईची मारामार

गेल्या दोन वर्षांपासून महागाईने सर्वसामान्यांच्या जीवनात मोठा कहर केला आहे. दैनंदिन वस्तूंचे भाव वाढल्याने किचनचे बजेट कोलमडले आहे. गॅस, पेट्रोल-डिझेलने आधीच त्रास दिलेला असताना, आता भाजीपाल्यानेही गृहिणींच्या डोक्यावर हात ठेवलाय. लिंबू ८ रुपयांना तर काकडी ८० रुपयांना पोहोचली आहे.

हे हि वाचा:Pune Porsche Accident: बिल्डर चा मुलगा नव्हे, ड्रायव्हर चालवत होता कार; नवीन दावा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

उत्पादनावर अवकाळी पावसाचा फटका

राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान केले आहे. काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती असल्याने शेतमालाचे उत्पादन कमी झाले आहे. बाजारात भाजीपाल्याची आवक घटल्याने आणि इतर कारणांमुळे दर वाढले आहेत. उन्हाच्या झळांमुळे भाजीपाला लवकर सुकत असल्याने ग्राहक तो खरेदी करण्यास टाळाटाळ करतात, यामुळे विक्रेत्यांनाही नुकसान सहन करावे लागत आहे.

लिंबू-काकडीचे दर गगनाला भिडले

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लहर आहे. तापमानात मोठी वाढ झाल्याने लिंबांना मोठी मागणी आहे. वाढत्या उकाड्यामुळे लिंबू पाण्यावर नागरिकांचा भर वाढला आहे. परिणामी, एका लिंबूसाठी ८ रुपये मोजावे लागत आहेत. तर काकडीचा दर ५० रुपयांवरून ८० रुपयांवर पोहोचला आहे.

भाज्यांचे वाढते दर

मुंबईत कोथिंबीर, शेपू आणि मिरचीचे दर १०० रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या किंमतींनी सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. कोथिंबीरची एक जुडी आता ५० रुपयांना मिळते, जे पूर्वी २०-२५ रुपयांना मिळत होती. शेपू २५ रुपयांहून ५० रुपयांवर गेला आहे. ६०-८० रुपयांना मिळणारी मिरची आता १०० रुपये दराने विकली जात आहे. टोमॅटोसह वांगी, कारली आणि इतर भाज्यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यामुळे ग्राहकांचे खिसे रिकामे होत आहेत.

गृहिणींची कसरत

डाळी महागल्या, भाजीपाला महागला, त्यामुळे गृहिणींना रोजचे जेवण करताना मोठी कसरत करावी लागत आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांतही शेतमालाची आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या किंमती वाढल्या आहेत. महागाईच्या या तडाख्यामुळे गृहिणींच्या जीवाला घोर लागला आहे.

महागाईच्या या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळवण्यासाठी सरकार आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा, किचनचे बजेट सांभाळणे सामान्यांसाठी अवघड होईल.

आणखी पाहा:Cotton Market Rate | आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव पुन्हा वाढले  | Cotton Rate March 2024

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews