व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Viral bike car video:दुचाकीस्वारांनी कारचालकाला छळल्याचा व्हिडीओ व्हायरल; नेटकरी संतापले, म्हणाले ‘असे बदमाश…’

By Rohit K

Published on:

Viral bike car video

Viral bike car video:दुचाकीस्वारांनी कारचालकाला छळल्याचा व्हिडीओ व्हायरल; नेटकरी संतापले, म्हणाले ‘असे बदमाश…’

Viral bike car video:व्हिडीओ कशा प्रकारे व्हायरल झाला

आजकाल लोक विचित्र स्टंट करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. या हव्यासामुळे ते कोणाचाही छळ करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. कधी स्वतःचा, तर कधी इतरांचा जीव धोक्यात घालण्याचे प्रयत्न हे लोक करतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि संबंधितांवर गुन्हे दाखल होतात. आज असाच एक Viral bike car video  सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही दुचाकीस्वार एका कार चालकाचा पाठलाग करताना आणि त्याला त्रास देताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडीओची माहिती

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

हा व्हिडीओ बंगळुरूचा आहे. पाच जणांचा ग्रुप एका कारचालकाला त्रास देताना दिसत आहे. या पाच जणांचा ग्रुप दोन दुचाकींवरून प्रवास करीत असतो. एक स्कूटी कारच्या मागून येते, तर दुसरी स्कूटी कारच्या बाजूने जाताना दिसते. बघता बघता दुचाकीस्वार कारच्या दरवाजाला लाथ मारतात. पुढे जाऊन एका चाकावर स्कूटी चालवण्याचा स्टंट देखील करतात. नक्की काय घडलं, हे व्हायरल व्हिडीओतून पाहा.

आणखी पाहा : Child viral video:चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल: बुडता बुडता वाचला जीव!

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि पोलीस कारवाई

Viral bike car video तुम्ही पाहू शकता की, एका अज्ञात गाडीचालकाने हे दृश्य मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलं आहे. काही दुचाकीस्वार मिळून कार चालकास त्रास देताना दिसत आहेत. सुरुवातीला ते कार चालकाचा पाठलाग करतात आणि मग त्याच्या कारवर जोरात लाथ मारतात. हा व्हिडीओ पाहून एका नेटकऱ्याने कमेंट केली की, “मी सहसा लोकांबरोबर काहीही वाईट घडावे यासाठी प्रार्थना करत नाही. पण, यावेळी या तरुणांनी स्कूटरवरून पडणे आवश्यक आहे. अपघातात निष्पाप जीव मरण पावतात, पण हे बदमाश पळून जाण्यात यशस्वी होतात”; अशी कमेंट केली आहे.

सोशल मीडियावर हा viral bike car video व्हिडीओ @gharkekalesh या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याची मागणी केली आणि बंगळुरू पोलिसांना टॅग केले. त्यामुळे हा व्हिडीओ इतका प्रचंड व्हायरल झाला की, बंगळुरू पोलिसांनी सुद्धा यावर कमेंट केली आहे आणि लिहिलं की, “सिल्कबोर्ड जंक्शन येथे सार्वजनिक रस्त्यावर चालकाला त्रास देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांची दुचाकी जप्त केली आहे”.

पाहा हा विडिओ : 

Viral bike car video
Viral bike car video

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews