व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Viral Jugad: गव्हाच्या पिठात शाम्पू मिसळून महिला करतेय जादू, VIDEO होतोय व्हायरल!

By Rohit K

Published on:

Viral Jugad

Viral Jugad: गव्हाच्या पिठात शाम्पू मिसळून महिला करतेय जादू, VIDEO होतोय व्हायरल!

 

Viral Jugad: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. कधी कोणी डान्सचे व्हिडीओ शेअर करतात, तर कधी कोणी गाणी म्हणतानाचे व्हिडीओ. कधी कोणी त्यांच्या कला सादर करतात, तर कधी हटके जुगाड आणि ट्रिक्स सांगताना दिसतात. असाच एक अनोखा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे, ज्यामध्ये एक महिला गव्हाच्या पिठामध्ये शाम्पू टाकून जादू करताना दिसत आहे. या व्हिडीओने अनेकांना थक्क केले आहे.

 

Viral Jugad: व्हिडीओमध्ये दिसणारा जादूई जुगाड

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला मोठा चमचा गव्हाचे पीठ घेते. त्यात एक छोटा चमचा मीठ मिसळते आणि त्यानंतर आपल्या आवडत्या शाम्पूचा थेंब टाकते. मग ती या मिश्रणाला चांगले एकत्र करते, पण पेस्ट तयार करत नाही. या पावडरच्या मदतीने ती घरातील भांडी आणि बेसिन स्वच्छ करते. या अनोख्या पद्धतीने सर्व काळपटपणा आणि मळ सहज दूर होतो.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

महिलेने सांगितले की, गव्हाच्या पिठामध्ये शाम्पू मिसळून तयार झालेली पावडर स्क्रबप्रमाणे वापरता येते, ज्यामुळे स्वच्छतेचे काम अधिक सुलभ होते. हा व्हिडीओ पाहून अनेक जण थक्क झाले आहेत आणि तुम्हीही हा जुगाड पाहून अचंबित व्हाल.Viral Jugad

Viral Jugad Video:

Viral Jugad: सोशल मीडियावर व्हायरल

@prajakta_salve_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, “गव्हाच्या पिठामध्ये शाम्पू टाकताच कमाल झाली” अशी कॅप्शन दिली आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी हा जुगाड आवडल्याचे सांगितले, तर काहींनी त्यावर टीका केली आहे.

 

एका युजरने लिहिले, “हा व्हिडिओ जर कोणी पूर्ण बघितला नाही तर तो शाम्पूच्या चपात्या खाईल,” तर दुसऱ्या युजरने म्हटले, “पिठापेक्षा राख वापरायची की… उगीच पिठाचे नुकसान.” आणखी एका युजरने लिहिले, “काय ओ ताई, एवढ्या नवीन आयडिया येतात कुठून?” काहींनी विचारले, “शाम्पूनेच घासायचे मग पीठ कशाला?”Viral Jugad

तुम्हीही हा अनोखा जुगाड नक्की ट्राय करून पाहू शकता. मात्र, तुम्हाला हा जुगाड कसा वाटला हे जरूर सांगा!

आणखी पाहा: Deshi Jugad: शेतकऱ्यांचा 1 अनोखा देशी जुगाड, पाहा हा व्हिडिओ

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews