Viral Love Letter: शाळेतल्या प्रेमाचा किस्सा: “प्रिय आकाश, तु मला प्रपोज केलं…” पोट धरून हसाल
Viral Love Letter: प्रेम ही एक अशी भावना आहे जी काळ बदलला तरीही आपल्या मनाच्या कप्प्यात कायमची राहते. एके काळी प्रेम व्यक्त करण्यासाठी पत्रांचा वापर होत असे, पण आता मोबाईल फोन आणि सोशल मीडियामुळे हे पत्र लिहिण्याचा ट्रेंड जवळपास नाहिसा झाला आहे. मात्र, कधी कधी इंटरनेटवर काही प्रेमपत्रं व्हायरल होत असतात, ज्यांचा मजकूर वाचून खरंच हसू आवरत नाही. असंच एक गंमतीशीर पत्र आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
हे पत्र एका शाळकरी मुलीनं लिहिलं असून सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अंकिता नावाच्या एका मुलीनं तिच्या वर्गातील आकाशसाठी हे पत्र लिहिलं आहे. तिच्या हस्ताक्षरावरून आणि पत्राच्या मजकुरावरून हे शाळकरी मुलीचं असल्याचं स्पष्ट होतं.
Viral Love Letter:
पत्रात अंकिता लिहिते, “तु मला प्रपोज केलं आणि मी तुला जे काही बोलले त्यासाठी सर्वात आधी सॉरी. नंतर मी विचार केला आणि माझं मन मला सांगत होतं, तुच आहेस तो ज्याची मी वाट बघते. जर माझ्याआधी तुला कोण आवडत असेल तर नाही म्हणालास तरी चालेल. तुझं माझ्यावर खर प्रेम असेल तर ‘हो’ म्हण.” सोबतच तिनं एक कविता देखील लिहिली आहे:
Viral Love Letter:
“माझं हृदय तुला दिलं,
तुझं हृदय मला दे.
प्रेम करते तुझ्यावर एवढं तरी समजून घे.
तुझी अंकिता…”
हे पत्र इंटरनेटवर व्हायरल झालं असून अनेक नेटकरी त्यावर गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत. काही जणांनी हे पत्र वाचून ‘निब्बा-निब्बीचं’ प्रेमप्रकरण असल्याचं म्हटलं आहे.
या पत्रामुळे अनेकांना त्यांच्या शाळेतील प्रेमाच्या आठवणींनी नॉस्टॅल्जिक वाटलं असेल. प्रेमाच्या या गमतीशीर आणि निरागस भावना इंटरनेटच्या माध्यमातून पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अशा अनेक किस्स्यांमधून आपल्याला प्रेमाची गोडी आणि त्यातलं गोडवा कळतो.viral Love Letter
पाहा हे पत्र:
View this post on Instagram
हे पत्र ‘@marathi_epic_jokes’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलं आहे, आणि त्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं आहे. शाळेतल्या प्रेमाचा हा गमतीशीर किस्सा ऐकून तुमचं मनही नक्कीच आनंदित झालं असेल.
अश्याच नवनवीन पोस्टसाठी आमच्या वाटसॲप ग्रुप ला जॉईन करा
आणखी पाहा: जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या सर्व भोगून घ्या.. Kalicharan Maharaj Viral Speech