Viral Reel Video: आई असून पोटच्या लेकराच्या जीवावर उठली; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही हादराल
सोशल मीडियावर धडकी भरवणारा व्हिडीओ, रीलसाठी मुलाला विहिरीत लटकवलं
आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे एका आईनं आपल्या पोटच्या लेकराचा जीव धोक्यात घालून त्याला खोल विहिरीत लटकवलं. हा Viral Reel Video व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे आणि तो पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल.
मुलाचा जीव धोक्यात; आईचा निष्काळजीपणा पाहून संतापले लोक
व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेल्या घटनेनुसार, एक महिला विहिरीच्या काठावर बसून आपल्या लहान मुलाला हाताने पकडून त्याला विहिरीत लटकवत आहे. या प्रसंगी ती कॅमेऱ्यासमोर पोज देत असून रील बनवण्यामध्ये तल्लीन झालेली दिसते. या निष्काळजी कृत्यामुळे तिचं आणि मुलाचं दोघांचंही प्राण धोक्यात आले आहेत.
हा प्रकार पाहून मुलगाही घाबरलेला दिसतो, त्याने आपल्या आईचा पाय घट्ट पकडून ठेवला आहे. व्हिडीओ पाहताना स्पष्ट दिसतं की, या महिलेने कोणताही संभाव्य धोका लक्षात न घेता फक्त काही सेकंदांच्या रीलसाठी आपल्या मुलाच्या जिवाशी खेळलं आहे.
नेटकऱ्यांचा संताप; “आई होण्यापेक्षा प्रसिद्धी महत्त्वाची?”
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी महिलेवर तीव्र टीका केली आहे. अनेकांनी या प्रकाराला नाकारलं असून, आईपणाच्या जबाबदारीला बाजूला ठेऊन केवळ इंटरनेट प्रसिद्धीसाठी असे कृत्य करणं संतापजनक असल्याचं सांगितलं आहे. “अगं, आई ना तू?”, “आजच्या जगात आई होण्यापेक्षा प्रसिद्धी महत्त्वाची झाली आहे” अशा प्रकारच्या भावना व्यक्त करत लोकांनी महिलेवर नाराजी व्यक्त केली आहे.
Viral Teacher Video 1: “उपस्थितीच्या बदल्यात Kiss दे” उन्नाव जिल्ह्यातील शाळेत मुख्याध्यापकाचा व शिक्षिकेचा धक्कादायक प्रकार – व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर दररोज आई आणि मुलाच्या नात्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, परंतु असं क्रूर कृत्य लोकांच्या भावना दुखावणारं ठरलं आहे.
पाहा हा व्हिडीओ:
Family court in custody case: Only mother can love child more. Even more than father.
Le mother:#ParentalAlienation pic.twitter.com/mc1kl5ziFj— Raw and Real Man (@RawAndRealMan) September 18, 2024