Viral video: मित्राची हाक: “मित्रा, जीव वाचव, परत ये” – दुचाकीस्वाराचा व्हायरल व्हिडीओ
Viral video: नदीच्या प्रवाहात दुचाकी घेऊन जाणारा तरुण
मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. नद्यांची पातळी धोकादायक स्तरावर पोहोचली असून अनेक ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात एक तरुण नदीच्या प्रवाहात दुचाकी घेऊन उतरला आहे. त्याचा मित्र त्याला वारंवार पाण्यात जाऊ नको सांगत आहे, परंतु त्याने ऐकले नाही आणि शेवटी जे घडले ते पाहून अंगावर काटा उभा राहतो.
Viral video: पाण्याच्या प्रवाहात दुचाकीस्वार
इंस्टाग्रामवर roadsafetycontent नावाच्या पेजवर हा Viral video व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की, एका रस्त्यावर नदीचं पाणी भरून आले आहे. बहुधा हा नदीचा पुल असावा. पाण्याची पातळी इतकी वाढली आहे की पुल दिसत देखील नाही. अशा परिस्थितीत एक तरुण बाईकवर बसून पाण्यात उतरतो. त्याचा मित्र त्याला पाण्यात जाऊ नको सांगतो, परंतु तो ऐकत नाही आणि दुचाकी घेऊन नदीच्या पाण्यात उतरतो.
आणखी पाहा :Manoj Jarange Hindi Interview Clip: मराठीची मजा हिंदीत
Viral video: दुचाकी वाहून गेल्याचा थरार
काही अंतर पुढे जाताच, तो अडकतो. पाण्याचा प्रवाह इतका जोरात असतो की त्याला दुचाकी पुढे नेता येत नाही. शेवटी त्याच्या हातातून दुचाकी निसटते आणि पाण्याबरोबर वाहून जाते. दुचाकी पकडण्याच्या नादात हा तरुणही पाण्यात वाहून गेला असता, परंतु त्याचा मित्र पुन्हा त्याला ओरडून सांगतो की, “दुचाकी नंतर शोधून देतो, तू परत ये, तुझा जीव वाचव.” व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे.
Viral video वर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया
व्हिडिओवर मजकूर लिहिलेला दिसत आहे ज्यामध्ये असे सांगितले आहे की, आयुष्यात लोक देव बनून मदतीसाठी धावत येतात. आपण त्यांच्या शब्दाचा मान ठेवला पाहिजे. वाहन चालवताना तुमची एक चूक तुमचं आणि इतरांचं कुटुंब उध्वस्त करू शकते. व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि नेटकऱ्यांनी कमेंट करुन पुराच्या पाण्यात गाडी नेणाऱ्या तरुणाला ट्रोल केले आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली की, “त्याला पकडून बेदम चोप द्यायला पाहिजे होते, कुठून अंगात मस्ती चढते एवढी काय माहिती?” तर दुसरा म्हणाला, “मित्राची एवढी तळमळ पाहून हे प्रेम फक्त गावाकडचं बघायला मिळतं.” तिसऱ्याने म्हटलं, “धोकादायक परिस्थितीत माघार घेतलेली चांगली असते हा चांगला बोध आहे.”
पाहा हा विडिओ :
View this post on Instagram