Waterfall video
पोहता येत असलेली लोकं सुद्धा वाहून गेली,video पाहा १ मिनिटांत कसं वाढतं धबधब्याचं पाणी
पावसाळ्यात धबधब्यांवर जाऊ नका असा सल्ला वारंवार दिला जातो. कारण पाण्याची मजा घेण्यासाठी लोकं धबधब्यांवर जातात आणि अचानक पाण्याची पातळी वाढते आणि लोकं वाहून जातात. अशी कितीतरी प्रकरणं आजवर घडली आहेत. पण पाण्याची पातळी अचानक कशी वाढते? हे जाणून घेण्यासाठी हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहा. आणि हो पावसाळ्यात नदीवर पोहायला जाणं टाळा कारण कधी काय घडेल सांगता येत नाही.
भुशी डॅममध्ये घडलेल्या प्रकरणामुळे अख्खा देश हादरला आहे. एकाच कुटुंबातील पाच जणं वाहून गेली. बरं, हे प्रकरण ताजं असतानाच ताम्हिणी घाट, लोणावळा आणि पुण्यातून अशाच प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
ज्यामध्ये लोकं पोहण्याचा आनंद घेण्याच्या नादात वाहून जाताना दिसताहेत. पण प्रश्न असा आहे लोकांना खरंच कळत नाही का नदीत कधी उतरायचं अन् कधी नाही ते? आश्चर्याची गोष्ट म्हणजे शहरी लोकांना नदीच्या पाण्याबाबत फारसा अनुभव नसतो पण चांगलं पोहता येत असलेली गावातली मुलं सुद्धा कशी काय वाहून जातात?
लोकं वाहून जाण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पाण्याची पातळी अचानक वाढणं. जवळपास सर्वच जण पाण्याची पातळी किती आहे? अन् तेवढं पाणी आपल्यासाठी सुरक्षित आहे का? हा विचार करूनच नदीत किंवा धबधब्यात उतरतात. पण अचानक डोंगरावर पाऊस पडतो आणि ते पाणी वाहत येऊन नदीची पातळी वाढते. अन् त्यामुळे आपसूकच वाहत्या पाण्याचा वेगही वाढतो.Waterfall video
व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करून पहा…