व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Wayanad Landslides Viral Video:केरळमध्ये भूस्खलनामुळे हाहाकार! वायनाडमध्ये लोकं झोपली होती, अचानक निसर्गाचा तांडव; VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल

By Rohit K

Published on:

Wayanad Landslides Viral Video:केरळमध्ये भूस्खलनामुळे हाहाकार! वायनाडमध्ये लोकं झोपली होती, अचानक निसर्गाचा तांडव; VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल

Wayanad Landslides Viral Video: केरळच्या वायनाडमध्ये घडलेल्या भूस्खलनाच्या भीषण विध्वंसाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मदतकार्याचेही व्हिडिओ पाहून लोकांच्या काळजाचा ठोका चुकतो आहे.

Kerala Wayanad Landslides Viral Video: केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे काही गावांमध्ये भूस्खलनाची घटना घडली आहे. या भूस्खलनामुळे १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. महाराष्ट्रातील माळीण दुर्घटनेला ज्या दिवशी दहा वर्षे पूर्ण झाली, त्याच दिवशी वायनाड येथे ही दुर्दैवी घटना घडली. लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकांनी सातत्याने बचावकार्य सुरू केले आहे. दरम्यान या विध्वंसाचे काही व्हिडिओ समोर आले असून, हे व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

आणखी पाहा :Lion viral video:फोटो काढण्यासाठी तो जिवंत दोन सिंहासमोर गेला; पण त्यानं जे केलं ते पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Kerala Wayanad Landslides Viral Video: वायनाडमधील या भूस्खलनाच्या व्हिडिओमध्ये पुरामुळे झालेल्या विध्वंसाचे दृश्य स्पष्टपणे दिसते. @Gokerala_ नावाच्या अकाऊंटवरून एक्सवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये NDRF च्या पथकाला मदत करताना दिसते. आजूबाजूला झाडे तोडलेली दिसतात, आणि वाहत्या पाण्यात एक कार अडकलेली दिसते. तुटलेल्या घरांचे ढिगारे पाण्यात विखुरलेले दिसतात. Kerala Wayanad Landslides Viral Video व्हिडिओमध्ये वायनाडमधील परिस्थिती किती गंभीर होती याचा अंदाज येतो.

पाहा हा विडिओ :

हा व्हिडिओ भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत एक्स पेज @IndiaCoastGuard वरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तटरक्षक दल मलबा हटवण्याचा प्रयत्न करताना दिसते. पुरामुळे जमिनीवर इतर मशिन चालवणे कठीण असल्यामुळे सर्व काम हातानेच करावे लागत आहे.

पाहा हा विडिओ :

@AbGeorge_ नावाच्या खात्यावरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विलनगड (कोझीकोड जिल्हा, केरळ) येथील दृश्ये दाखवली आहेत. काही शेजारी घरापासून ५० मीटर अंतरावर बेपत्ता आहेत. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत, संपूर्ण परिसर वेगळा झाला आहे.

पाहा हा विडियो:

एक्सवर @pavioffcl अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वायनाडमधील विध्वंसाचे दृश्य एरियल व्ह्यूमध्ये दिसत आहे. झाडे तुटून विखुरली आहेत, काही वाहने झाडांमध्ये अडकलेली दिसतात, आजूबाजूला पाण्याचा महापूर दिसतो.

पाहा हा विडिओ :

वायनाडमध्ये बचावकार्य सुरू झाले आहे. एनडीआरएफ कमांडर अखिलेश कुमार यांनी सांगितले की, बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. त्यांच्या टीमने इथल्या अनेक गावांमध्ये जाऊन लोकांना वाचवण्याचे काम केले आहे. अनेक घरांमध्ये लोक अडकले असल्याची शक्यता आहे. काल रात्री खराब हवामानामुळे बचावकार्य थांबवावे लागले. अधिक पाऊस झाल्यास धोका वाढू शकतो.

Wayanad Landslides Viral Video
Wayanad Landslides Viral Video

मंगळवारी सकाळी वायनाडमध्ये मोठा विध्वंस झाला. अचानक आलेल्या पुरामुळे सुमारे २२,००० लोकसंख्या असलेली चार गावे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. या विनाशकारी वादळात १५० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर १०० हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. सततच्या पावसामुळे मदत आणि बचावकार्य कठीण होत आहे.

Rohit K

Related Post

1 thought on “Wayanad Landslides Viral Video:केरळमध्ये भूस्खलनामुळे हाहाकार! वायनाडमध्ये लोकं झोपली होती, अचानक निसर्गाचा तांडव; VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल”

Leave a Comment

Close Visit agrinews