Whatsapp viral chat: ‘आई माझा जीव घेईल ओ…’ बॉसकडे मागितली सुट्टी, पण मिळाला असा रिप्लाय की व्हॉट्सॲप चॅट झाले व्हायरल
Whatsapp viral chat: व्हॉट्सॲप व्हायरल चॅट सुट्टीची विनंती आणि मजेशीर उत्तर
सोशल मीडियावर व्हायरल व्हॉट्सॲप चॅट
आजकाल सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. एका तरुणीने आपल्या बॉसकडे सुट्टी मागितली आणि त्या संभाषणाचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट केला Whatsapp viral chat. हे व्हॉट्सॲप चॅटिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. अनेक कर्मचार्यांसाठी सर्वांत कठीण गोष्ट म्हणजे त्यांच्या बॉसकडून सुट्टी मंजूर करून घेणे. बॉसना रजेचा अर्ज पाहताच डोकेदुखी होते. जवळ-जवळ प्रत्येक कर्मचारी आपल्या बॉसला कंटाळलेला असतो. कामाच्या ओझ्यामुळे सुट्टीची आवश्यकता वाटली तर तुम्हीही बॉसकडे सुट्टी मागता, पण जर सुट्टी मिळाली नाही तर आजारी असल्याचे कारण सांगून दांडी मारता.
पाहा विडिओ :Milk Rate: राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर: राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
सुट्टीसाठी विनंती आणि बॉसचे उत्तर
एका तरुणीने बॉसकडे सुट्टी मागितली आणि त्यानंतर काय घडले हे पाहा. Whatsapp viral chat तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून मॅनेजर आणि तिच्या दरम्यानच्या चॅटिंगचा स्क्रीनशॉट पोस्ट केला.
ऑफिसचे वर्क कल्चर आणि कामाचा ताण
प्रत्येक ऑफिसचे वर्क कल्चर वेगळे असते आणि कामाचा ताणही तितकाच जास्त असतो. रजा मागणे सोपे नसते. काही वेळा तुमचा रजेचा अर्ज फेटाळला जातो. अशाच एका तरुणीने रजा नाहीतर अर्ध्या दिवसाची तरी सुट्टी द्या अशी विनंती बॉसकडे केली. महिलेनं आईच्या नावानं अर्ध्या दिवसाची सुट्टी मागितली. पण बॉसनं नकार दिला. मात्र त्याने हा नकार ज्या पद्धतीनं दिलाय ते पाहून खरंच हसू येईल.
Whatsapp viral video: काय आहे चॅटमध्ये?
महिलेला पूर्ण दिवसाची सुट्टी मिळत नसल्याने तिने अर्ध्या दिवसाची सुट्टी मागितली. तिनं अत्यंत आदरानं बॉसला विनंती अर्ज केला. तिचा मेसेज होता, “बॉस प्लिज मला अर्ध्या दिवसाची सुट्टी द्या. खरं तर मला पूर्ण दिवसाची सुट्टी हवी होती. पण ऑफिसमध्ये काम खूप आहे, त्यामुळे पूर्ण सुट्टी घेणं योग्य ठरणार नाही. प्लीज मला अर्ध्या दिवसाची सुट्टी द्या.”
बॉसनं हसत उत्तर दिलं, “मी रिक्वेस्ट करतोय, तू सुट्टी घेऊ नकोस.” यावर ती कर्मचारी म्हणाली, “जर मी सुट्टी घेऊन घरी गेली नाही तर आई माझा जीव घेईल.” बॉसनं दिलेलं उत्तर वाचून ती पुढे वाद घालायला गेली नाही. तो म्हणाला, “तुम्ही २५ वर्षांच्या झाल्या आहात आणि या वयातही सुट्टी मिळवण्यासाठी तुम्हाला आईचं कार्ड वापरावं लागतंय.”
हे संभाषण व्हायरल झालं आणि अनेकांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली. कामाच्या ताणामुळे सुट्टी मिळवण्यासाठी अनेक जण अशा प्रकारच्या युक्त्या वापरतात, पण बॉसचं उत्तर मात्र अनेकांना हसवून गेलं.
पाहा ही पोस्ट:
imagine being 25 and still pulling the mom said no card. pic.twitter.com/msDb46YC1S
— praachiii (@crankyranterr) July 31, 2024