व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

10th Pass Farmer Story :10वी पास आणि 70 लाखाचे वार्षिक उत्पन्न तेही शेतीतून…

By Rohit K

Published on:

10th Pass Farmer Story:10वी पास आणि 70 लाखाचे वार्षिक उत्पन्न तेही शेतीतून…

साधारणतः १०वीपर्यंतच शिक्षण घेतलेल्या एखाद्या शेतकऱ्याची वार्षिक कमाई किती असू शकेल? काही हजारांमध्ये, फार तर लाखभर रुपयांपर्यंत जात असावी असं वाटणं स्वाभाविक आहे. पण जर तुम्हाला सांगितलं की एका शेतकऱ्याने केळी शेतीत क्रांती घडवून, आयआयटी इंजिनिअरपेक्षाही जास्त कमाई केलीय, तर? गुजरातचे धीरेंद्र कुमार भानुभाई या केळी उत्पादक शेतकऱ्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केळी शेतीत असा चमत्कार घडवून आणला आहे की केंद्र शासनानेही त्यांच्या नाविन्यपूर्ण कामाचं कौतुक केलं आहे.

10th Pass Farmer Story: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

केवळ २६ महिन्यांत तीन वेळा केळीचं उत्पादन घेणारे धीरेंद्र कुमार भानुभाई हे भारतातील एकमेव शेतकरी ठरले आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी मॅलिक बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्यांचा गौरव केला आहे. त्यांनी ऊती संवर्धन, ठिबक सिंचन, आणि एकात्मिक पोषण व्यवस्थापनासारख्या प्रगत तंत्रांचा वापर केला. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाने, केळीवर पडणारे रोग आणि बुरशीचा धोका कमी झाला, आणि फवारणी बॅगिंग व कापणी तंत्रांमुळे केळीची गुणवत्ता अधिक सुधारली.

आणखी हे पाहा: Viral Teacher Video 1: उपस्थितीच्या बदल्यात Kiss दे उन्नाव जिल्ह्यातील शाळेत मुख्याध्यापकाचा व शिक्षिकेचा धक्कादायक प्रकार  व्हिडिओ व्हायरल

परदेशात केळी निर्यात करणारे शेतकरी

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

धीरेंद्र कुमार यांची पहिली केळी निर्यात २०१४ साली झाली. आज ते दुबई, अबुधाबी, ओमान, आणि सौदी अरेबीयाला केळी निर्यात करतात. त्यांच्या G9 जातीच्या केळीला देशभर मागणी आहे. प्रतिहेक्टर होणारा नफा १६.७० लाख रुपयांचा आहे, आणि त्यांच्या या यशाने गुजरातसह महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा दिली आहे.

10th Pass Farmer Story: वर्षाचं उत्पन्न आयआयटी इंजिनियरपेक्षाही अधिक

धीरेंद्र कुमार यांच्या केळी शेतीतून वार्षिक उत्पन्न साधारण ७० लाख रुपये आहे, जे एका आयआयटी इंजिनियरच्या पगारापेक्षा कितीतरी अधिक आहे. त्यांनी आधुनिक शेती तंत्रांचा वापर करत अनेकांना रोजगार दिला आहे, आणि ड्रोनसारख्या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून केळी शेतीत नवा आयाम आणला आहे.

🔗आणखी वाचा: Shetkari Yashogatha 2024: वा रे पठ्या! आंबा विक्रीतून रायचूरच्या शेतकऱ्याची  लाखोंची कमाई ,नोकरी सोडून शेतीचा मार्ग

व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

10th Pass Farmer Story
10th Pass Farmer Story

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews