व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Dinner & Breakfast Timing : रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाश्ता कधी करावा? जाणून घ्या, तज्ज्ञांनी सांगितली योग्य वेळ

By Rohit K

Published on:

Dinner & Breakfast Timing

Dinner & Breakfast Timing : रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाश्ता कधी करावा? जाणून घ्या, तज्ज्ञांनी सांगितली योग्य वेळ

Dinner & Breakfast Timing: आपल्या जेवणाच्या वेळेचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. चयापचय क्रिया आणि निरोगी जीवनशैलीसाठी Dinner & Breakfast Timing यामध्ये ठराविक अंतर असणे महत्त्वाचे आहे.

सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण

सकाळचा नाश्ता हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि त्याचा थेट संबंध रात्रीच्या जेवणाच्या वेळेबरोबर असतो. Dinner & Breakfast Timing यामध्ये ठराविक काळामध्ये करणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

आहारतज्ज्ञ सल्लागार कनिक्का मल्होत्रा यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, रात्रीचे जेवण आणि नाश्ता यांच्यामध्ये अंदाजे १२ ते १४ तासांचे अंतर असावे. हा काळ उपवासाचा मानला जातो आणि यामुळे आपल्याला अनेक आरोग्याचे फायदे मिळू शकतात.

१२-१४ तासांच्या उपवासाचे फायदे

मल्होत्रा यांनी दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यामध्ये १२-१४ तासांचे अंतर ठेवण्याचे फायदे खालीलप्रमाणे सांगितले आहेत:

  • चयापचय क्रिया सुधारते: १२-१४ तासांच्या या उपवास कालावधीत फक्त शरीरातील ग्लुकोजवर अवलंबून न राहता चरबीचा वापर वाढवून चयापचय क्रिया सुरळीत ठेवता येते. यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका कमी होतो.
  • हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्य सुधारते: रात्रीचे जेवण आणि नाश्ता यामध्ये १३ तासांचे अंतर ठेवल्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
  • पचन क्रिया सुधारते: या अंतरामुळे पचनासाठी पुरेसा वेळ मिळतो, ज्यामुळे ॲसिडिटीसारख्या समस्या उद्भवत नाही आणि शरीराला चांगले पोषक घटक मिळतात.
  • झोपेची गुणवत्ता सुधारते: रात्री लवकर जेवण केल्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते आणि चांगली झोप येते.
वाचा: Weight Loss Secret: वजन कमी करण्याचे सिक्रेट: रात्रीच्या जेवणात किती चपात्या खाव्यात?

नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

मल्होत्रा सांगतात की, रात्रीचे जेवण आणि नाश्त्यासाठी खालील जेवणाच्या वेळा आहेत:

  • रात्रीचे जेवण: संध्याकाळी ६ ते ८ वाजतादरम्यान रात्रीचे जेवण शरीरासाठी फायदेशीर असते. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि चांगली झोप येते.
  • नाश्ता: सकाळी ७ ते ९ दरम्यान नाश्ता करावा, यामुळे दिवसभर चयापचय क्रिया सुरळीत राहते आणि शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते.

रात्रीचे जेवण आणि सकाळच्या नाश्त्यादरम्यान १२ तास नियमित काहीही न खाल्ल्यामुळे शरीराचे वेळापत्रक तयार होते आणि चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सामान्य मार्गदर्शक तत्वे आहेत. वैयक्तिक गरजा, जीवनशैली आणि संपूर्ण आरोग्याच्या परिस्थितीचा थेट परिणाम जेवणाच्या वेळेवर होऊ शकतो. त्यामुळे आहार आणि आहाराच्या वेळेत बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जेवणाच्या वेळेबाबत काळजी घेत आपण आपल्या दिनचर्येत याचा समावेश करू शकतो, ज्याचा चांगला परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येईल.

Dinner & Breakfast Timing
Dinner & Breakfast Timing

हेही वाचा: Walking After Dinner: रात्रीच्या जेवणानंतर 30 मिनिटे चालल्यानं तुमच्या शरीरावर होतील हे परिणाम..

 

 

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews