व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Kolkata Doctor Rape And Murder: कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरण: पद्म पुरस्कार विजेत्या ७० डॉक्टरांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

By Rohit K

Published on:

Kolkata Doctor Rape And Murder: कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरण: पद्म पुरस्कार विजेत्या ७० डॉक्टरांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र

Kolkata Doctor Rape And Murder: कोलकाता महाविद्यालयात महिला डॉक्टरवर अत्याचार

कोलकाता येथील आर. जी. कर मेडिकल महाविद्यालयात गेल्या आठवड्यात घडलेल्या भयानक घटनेने देशभरात खळबळ माजवली आहे. एका महिला डॉक्टरवर अत्याचार करण्यात आला, त्यानंतर तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेने सारा देश हादरला असून, विविध पैलू समोर येत आहेत.

Kolkata Doctor Rape And Murder:पद्म पुरस्कार विजेत्या डॉक्टरांची मागणी

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

या भीषण घटनेच्या पार्श्वभूमीवर, देशातील ७० पद्म पुरस्कार विजेत्या डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पीडितेला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. त्यांनी या प्रकरणात कठोर पावले उचलण्याची विनंती केली आहे.

आणखी पाहा : Crop insurance :- पिक विम्याचे 371 कोटी रुपये 73 हजार शेतकरी पात्र कोणत्या तालुक्यातले किती??

Kolkata Doctor Rape And Murder: डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत चिंता

पद्म विजेत्या डॉक्टरांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “R G Kar मेडिकल महाविद्यालयात घडलेली घटना अत्यंत दुःखद आहे. महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि तिची हत्या या घटनेने देशाला धक्का बसला आहे. डॉक्टर आपल्या देशातील आरोग्यसेवा देत असताना त्यांची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे, विशेषतः महिला डॉक्टरांची.”

एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया, मेदांता रुग्णालयाचे संचालक डॉ. नरेश तेहान, डॉ. हर्ष महाजन आणि फोर्टिसचे संचालक अशोक सेठ यांच्यासह ७० हून अधिक डॉक्टरांनी या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.

पत्रातील प्रमुख मागण्या

डॉक्टरांनी पत्रात काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत:
– महिला डॉक्टरांचा लैंगिक छळ, बलात्कार किंवा अन्याय झाल्यास आरोपींना कठोर शिक्षा दिली जावी.
– रुग्णालये आणि मेडिकल महाविद्यालयांमध्ये डॉक्टरांची सुरक्षा सुनिश्चित केली जावी.
– आरोग्यसेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्यास त्वरित न्याय मिळावा.

पीडितेच्या कुटुंबाची प्रतिक्रिया आणि तपास

पीडित मुलीच्या मृत्यूची बातमी मिळताच तिच्या कुटुंबीयांनी सांगितले की, ती कामाच्या दबावाखाली होती. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडून केला जात आहे. पोलिस तपासानुसार, पहाटे ३ ते ५ वाजण्याच्या दरम्यान तिच्यावर बलात्कार झाला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली.

संपूर्ण देशभरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात त्वरित आणि कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews