Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना ,महिलांसाठी रोजगाराची नवी संधी, ११,००० रुपये महिना मानधन
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास “लाडकी बहीण योजना” Ladaki Bahin Yojana जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना फक्त ४ तासांचा रोजगार देण्यात येणार आहे, ज्यासाठी त्यांना ११,००० रुपये महिना मानधन मिळेल. २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. योजनेची सुरुवात अद्याप अधिकृतपणे झालेली नाही, कारण याबाबत कोणताही शासकीय आदेश (GR) जारी झालेला नाही. योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक अंगणवाड्यांमध्ये अर्ज करता येणार आहेत.
योजनेचे उद्दिष्ट:
लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक स्थैर्यासाठी एक मोठा पाऊल ठरणार आहे. महिलांना त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांबरोबरच हा अल्पकाळाचा रोजगार मिळणार असल्यामुळे त्यांना घरकाम सांभाळूनही नोकरी करण्याची संधी मिळेल. महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल.
अर्जाची प्रक्रिया:
योजनेअंतर्गत पात्र महिलांना अंगणवाडी केंद्रांमध्ये अर्ज करावा लागेल. अधिकृत जाहीरात येईपर्यंत अर्ज प्रक्रिया आणि पात्रतेचे निकष स्पष्ट करण्यात येणार आहेत.