ST bus: मुंबई, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटी बस गच्च भरल्या,४,३०० जादा एसटी बस सोडण्याचा निर्णय
ST bus: ४,३०० जादा एसटी बस सोडण्याचा निर्णय
मुंबई: कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव हा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. गणेशोत्सवानिमित्त कुटुंबियांसह जाणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असते. यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून, मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्यांनी एसटी बसला पसंती दिली आहे. त्यामुळे, एसटी महामंडळाने २ ते ७ सप्टेंबर दरम्यान ४,३०० जादा एसटी बस ST bus सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
आणखी पाहा :The Baap Company :- बापाची कमाल शेतकऱ्यांच्या मुलासाठी IT जॉब देणारी ठरली उत्कृष्ट कंपनी
आरक्षणाची वाढती मागणी
यंदा एसटीच्या १,३०१ बसचे गट आरक्षणासह एकूण २,०३१ जादा बस ST bus पूर्णपणे आरक्षित झाल्या आहेत. एसटी महामंडळाने गणेशोत्सवासाठी सोडलेल्या या जादा बसमध्ये व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणही करण्यात आले आहे. अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे.
विशेष सुविधा
२ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकांतून जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. मुंबईतून कोकणातील थेट गावी वाडी-वस्तीपर्यंत सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी एसटीने घेतली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी वर्षानुवर्षे धावत असते.
व्यवस्थापन आणि सुरक्षा
एसटी महामंडळाने सुमारे ४,३०० जादा बस सोडण्याचे ठरवले आहे, त्यापैकी २,०३१ बसचे पूर्ण आरक्षण झाले आहे. गणेशोत्सव काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानके व बसथांब्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहतील. कोकणातील महामार्गांवर वाहनदुरुस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृहे उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी आणि सुरक्षिततेसाठी घेतलेल्या या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मोठी सुविधा मिळणार आहे.