व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

Mumbai murder case: मुंबईतील दादर स्थानकात तुतारी एक्स्प्रेसमध्ये रक्ताने माखलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

By Rohit K

Published on:

Mumbai murder case

Mumbai murder case: मुंबईतील दादर स्थानकात तुतारी एक्स्प्रेसमध्ये रक्ताने माखलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

Mumbai murder case: दादर स्टेशनवर मूकबधिर व्यक्तींच्या ट्रॉली बॅगमध्ये सापडला मृतदेह

मुंबईतलं दादर स्टेशन हे कायम गर्दीने गजबजलेलं असतं. त्या ठिकाणी प्रवाशांची कायमच मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. एका बॅगेत रक्ताने माखलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दादर स्टेशनच्या फलाट क्रमांक ११ वर पोलिसांच्या सतर्कतेमुळे चार तासांत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Mumbai murder case दादरच्या फलाट क्रमांक ११ या ठिकाणी दोन मूकबधिर व्यक्ती तुतारी एक्स्प्रेसमध्ये चढत होते. त्यांच्याकडे चाकं असलेली ट्रॉली बॅग होती. ही बॅग ट्रेनमध्ये चढवताना दोघांची खूप दमछाक झाली. बॅगेच्या वजनामुळे दोघांनाही घाम फुटला होता. ही गोष्ट रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोष कुमार यादव आणि पोलीस माधव केंद्रे यांच्या नजरेतून सुटली नाही. या दोघांच्या हालचालीही संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना थांबवून बॅग उघडायला सांगितली. बॅग उघडल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला कारण बॅगेत रक्ताने माखलेला मृतदेह होता. या मृतदेहाच्या डोक्यावर गंभीर घाव होते.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा

आणखी पाहा :Death viral video: दैव बलवत्तर म्हणून तो वाचला: मृत्यू जवळ आला आणि असा चमत्कार घडला! थरारक व्हिडीओ पाहा

Mumbai murder case: पोलिसांनी केलेली तपासणी

Mumbai murder case पोलिसांनी या प्रकरणात दोघांनाही ताब्यात घेतलं आणि बॅगही ताब्यात घेतली तसंच पुढील तपास सुरु केला. पोलिसांच्या माहितीनुसार, बॅगेत आढळलेला मृतदेह अर्शद अली सादिक शेख याचा होता. अर्शद हा सांताक्रुझच्या कलिना भागात राहण्यासाठी आला होता. शिवजीत सिंह आणि प्रवीण चावडा या दोन मूकबधिर व्यक्तींनी त्याची हत्या केली. हत्येनंतर मृतदेहाची कोकणात जाऊन विल्हेवाट लावायची योजना त्यांनी आखली होती. त्यामुळे एका ट्रॉली बॅगमध्ये हा मृतदेह त्यांनी भरला होता. तुतारी एक्स्प्रेसने ते दोघंही कोकणात जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि जड बॅगेतील संशयास्पद हालचालीमुळे गुन्ह्याची उकल झाली.

Mumbai murder case: आरोपींची अटक

ही घटना उघडकीस आल्यानंतर शिवजीत सिंह हा दादर स्थानकातून पळून गेला होता. पोलिसांनी प्रवीण चावडाकडून त्याची माहिती घेतली आणि त्यानंतर त्याचा माग काढत त्याला उल्हासनगरहून अटक केली. खुनासाठी वापरण्यात आलेलं हत्यारही पोलिसांनी जप्त केलं आहे. या प्रकरणी आता दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि या दोघांना आता न्यायालयात हजर केलं जाईल.

निष्कर्ष

Mumbai murder case
Thumbnail Credit- बोल भिडू टीम🙏🏻

Mumbai murder case मुंबईतील दादर स्थानकातील ही घटना पोलिसांच्या सतर्कतेमुळे चार तासांतच उघडकीस आली. या घटनेमुळे मुंबईतील सुरक्षिततेबाबतचे प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे आरोपींची अटक झाली असून, पुढील तपासणी सुरु आहे.

पाहा बातमी व्हिडिओद्वारा:

Rohit K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews